#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिद्धीसाठी
*भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री राज के पुरोहित यांच्या निधनाने गरिबांच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व हरपले*
*~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*
मुंबई दि.18 ~ भाजप चे ज्येष्ठ नेते माजी कॅबिनेट मंत्री राज के पुरोहित यांच्या निधनाने झोपडपट्टीवासीयांबद्दल सहानुभूती असणारे ; गरीबांच्या प्रश्नांची जाण आणि जाणीव असणारे सहृदय नेते सरल सुस्वभावी नेतृत्व हरपले आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत राज के पुरोहित यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
भाजप चे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री राज के पुरोहित यांच्याशी अनेक वर्षांपासून चांगले मैत्रीपूर्ण सबंध होते.त्यांनी कुलाब्यातील झोपडपट्टीवासीयांबद्दल सहानुभूती ठेवून त्यांचे प्रश्न सोडविले. त्यांनी भाजप चे एकनिष्ठ राहून समाजसेवा केली.मुंबईतील राजस्थानी जनतेचा आवाज त्यांनी नेहमीच बुलंद केला.मुंबई च्या विकासात राज के पुरोहित यांचे योगदान असून त्यांच्या स्मृती कायम राहतील अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख
#RAMDASATHAWALE ##Breakingnews #follow