भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण सण म्हणजे भोगी.
भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो. या दिवशी वाल, पावटा, घेवडा, हरभरा, वाटाणा या सर्व भाज्या मिळून एक भाजी तयार केली जाते. त्यामध्ये आवर्जून तीळ कुटून टाकले जातात, तीळयुक्त बाजरीची भाकरी ही या दिवशीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल! हा काळ थंडीचा असल्याने शरीरात अतिरिक्त ऊर्जेच्या निर्मितीसाठी या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. तसेच या दिवशी सुवासिनींकडून “वाण पूजन प्रथा” ही करण्यात येते.
आपल्याला आणि आपल्या परिवाराला भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!!
#मकर संक्रात #मकर संक्रात #मकर संक्रात #मकर संक्रात #संक्रात