विजय जयसिंग पाटील
415 views
🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹 🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻 *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹* *बुधवार दिनांक २८.०१.२०२६* *🎶सुमन गीताची🎶* ⚜️⚜️⚜️⚜️⚜️ *🩹पद्मभूषण🩹* *💐सुमनताईंचा वाढदिवस💐* ⚜️⚜️⚜️⚜️⚜️ 🌸🥀🔆🌺🎶🌺🔆🥀🌸 *जगात एकाच वेळी सात जणांचे चेहरे एकसारखे असू शकतात असा (गैर) समज दृढ आहे. अनेकदा विलक्षण साम्य दिसून येत असले तरीही विज्ञान सांगते की प्रत्येकाची शारीरिक रचना, नाक, डोळे, ओठ, कानाचे आकार, चेहऱ्याचा पोत, त्वचेचा रंग आणि हाडांची रचना हे सर्व वेगवेगळं असतं.* *हे वैज्ञानिक सत्य मानलं तरीही दोन गायिकांच्या आवाजात एवढे तंतोतंत साम्य याला काय म्हणावे.. की दैवी कृपा.. याचे साक्षीदार आहेत करोडो देशवासी. या दोन जगविख्यात गायिका म्हणजे सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकर.* *'जिथे सागरा धरणी मिळते..", "नाविका रे..", "केतकीच्या बनी..", "अरे संसार संसार.." अशी अनेक गाणी, अगदी हिन्दीतील पण सुमनताईनी अशी गायलीत की दर्दी श्रोतेही ही गाणी लतादीदींची म्हणून फसतात.* *सुमन.. अर्थातच चांगले मन. असे नावाप्रमाणेच चांगले मन लाभलेल्या जेष्ठ गायिका पद्मभूषण सुमन हेमाडी.. सुमन कल्याणपुर यांचा आज जन्मदिवस (१९३७), जन्म ढाका. त्यांची अनेक गाणी ही माहेरच्या 'हेमाडी' नावानेही प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडिल हेमाडी हे बँकेत मोठे अधिकारी होते.* *या पाच बहिणी, एक भाऊ असे हे हेमाडी कुटुंब. त्यांनी शिक्षणासाठी मुंबई गाठले. खरं म्हणजे सुमन यांचा कल होता तो चित्रकला आणि संगीताकडे. त्यांनी जे. जे. मध्येही शिक्षण घेतले. पण वडिलांच्या मित्राने गळ्यातील गोडवा ओळखून त्यांना गाणे शिकण्याचा सल्ला दिला.* *आणि १९५३ मधील 'शुक्राची चांदणी' च्या गाण्याने या चांदणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांना मग हिंदीतही 'मंगू' चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. पूढे नौशाद यांनी 'दरवाजा' उघडला. मंगेशकर भगिनींचे संगीत जगतात राज्य असतांनाच्या काळात त्यांनी स्वतःचे असे वेगळे अस्तित्व सिद्ध केले. त्यांनी रफींसोबत चक्क १४० युगलगीते गायली. तत्कालीन हिंदीतील सर्वच नामवंतासोबत.. अगदी मुकेश सह गाणी गायलीत.* *आज जवळपास ७५० पेक्षा जास्त चित्रपट तसेच मराठी.. हिंदी.. असामी, गुजराथी, कन्नड.. मैथिली.. भोजपुरी.. राजस्थानी इ. भाषांत इतरही गाणी त्यांनी गायलीत. रसिकांना तृप्त केलेय.* *कृष्णाच्या भक्तीत भक्त एवढे लीन होतात की त्यांचे संपूर्ण जीवनच कृष्णमय होवून जाते. 'अत्र तत्र सर्वत्र' कृष्णच दिसतो. हे जीवनच कृष्णमय होवून जाते. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नको असते. हेच भाव व्यक्त करणारे कृष्णलळेचे हे सुरेल गीत.* *जेष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. निरामय आरोग्य कामना.* 🌹⚜️🌸🥀🎶🥀🌸⚜️🌹 *कृष्ण गाथा एक गाणे* *जाणते ही वैखरी* *एक तारी सूर जाणी* *श्री हरी जय श्री हरी ॥धृ॥* *तू सखा, तू पाठिराखा,* *तूच माझा ईश्वर* *राहिलासी व्यापूनीया* *तूच माझे अंतर* *आळवीते नाम ज्याला* *अमृताची माधुरी ॥१॥* *पाहते मी सर्व ते ते* *कृष्ण रूपी भासते* *आणि स्वप्नी माधवाच्या* *संगरी मी नाचते* *ध्यान रंगी रंगताना* *ऐकते मी बासरी ॥२॥* *तारिलेसी तू कन्हैया* *दीनवाणे, बापुडे* *हीन मीरा त्याहूनीही,* *भाव भोळे भाबडे* *दे सहारा, दे निवारा* *या भवाच्या संगरी ॥३॥* 🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹 *गीत : यशोदकुमार गवळणकर* ✍ *संगीत : दशरथ पुजारी* *स्वर : सुमन कल्याणपूर* 🎼🎶🎼🎶🎼 🎧 *!!सर्वांना राम कृष्ण हरी!!* *!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!* *श्री स्वामी समर्थ* *समाजातील प्रामाणिक, समाजसेवक, यांच्यावर प्रेम करा पण विश्वासघातकी, दगाबाज, खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, चुगलीखोर अश्या लोकांपासुन सावध व दूर रहा, कुठल्याही अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.* 🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻 #☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात