#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
*रुग्णांना जीवदान देणा-या डॉक्टरांचे समाजात महत्वाचे स्थान - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*
मुंबई दि.17- कोरोनाच्या काळात जगभरात कोटयांवधी लोकांचे जीव वाचविण्याचे पुण्य डॉक्टरांनी केले आहे. रुग्णांना जीवदान देणा-या डॉक्टरांचे स्थान समाजात महत्वाचे आहे असे प्रतिप्रादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. कफ परेड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे कॅन्सर फाऊंडेशन आणि ज्युपिटर डायकेम प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने वोक्हार्ड हॉस्पीटल आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटक म्हणुन ना. रामदास आठवले उपस्थित राहिले त्यावेळी ते बोलत होते. शिबीरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना इस्त्रीचे आणि बाल विद्यार्थ्यांना लेटरपॅडचे वाटप केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
वैद्यकीय मदत आणि आरोग्यासाठी शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे असे आवाहन यावेळी ना. रामदास आठवले यांनी केले. या आरोग्य शिबीराचे आयोजन रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिनभाई मोहिते, सारिका मोहिते, संदिप मोहिते, संदेश मोहिते, सिध्दांत सचिनभाई मोहिते आणि रुकेश भालेराव यांनी केले. या आरोग्य शिबीराचा लाभ अनेकांनी घेतला.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख
##Breakingnews #follow #RAMDASATHAWALE