आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांती हा उत्सव जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकरसंक्रांत साजरा केला जातो. हा उत्सव वेगवेगळ्या नावाने भारतातील विविध प्रांतात साजरा केला जातो. संक्रांतीचा सण हा आरोग्याशी निगडीत आहे. चांगलेचुंगले, पौष्टिक खा, शारीरिक-मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवा. एकमेकांशी गोड बोला असा संदेश या सणातर्फे दिला जातो. भूतकाळातील कडू आठवणीना विसरून जाऊन त्यात तीळ आणि गुळ यांचा गोडवा भरायचा असतो.मकरसंक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा !
#मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा💐