खरा तो एकची धर्म.... जगाला प्रेम अर्पावे.....
अशी मायेची शिकवण देणारे पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी)यांची जयंती...
अध्यापण कार्य,समाजसेवा, स्वातंत्र्ययुध्द अशा बहुविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमहत्व म्हणजे 'साने गुरुजी' मातृभूमीच्या सेवेसाठी नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्यसमरात त्यानी स्वताला झोकून दिले आणि अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सुखासाठी झटत राहिले.समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी ,एकता निर्माण व्हावी,शेतकरी-कामकरी वर्गाचे दैन्य-दारिद्रय दूर व्हावे व सर्वत्र समाजवादाची स्थापना व्हावी या हेतूने ते सर्वत्र जनजागृती करत राहिले.लहान
मुले,स्त्रीया,तरुण,दीन-दलित याना स्वत्त्वाची जाणीव व्हावी व उत्तमोत्तम विचाराची देणगी मिळावी यासाठी अत्यंत संस्कारक्षम साहित्य त्यानी निर्माण केले.आज साने गुरुजीसारखे उदात्त व्यक्तिमत्त्व आपल्यामध्ये नसले तरीही त्याचा साहित्यरुपी अनमोल ठेवा आपल्याकडे आहे.
साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...!
#साने गुरुजी जयंती💐