काउंटडाउन सुरू... HRA बाबत सर्वात मोठ्या निर्णयाची शक्यता; बजेट उतरेल का दुर्लक्षित मध्यमवर्गाच्या अपेक्षांवर खरं?
Union Budget 2026 Expectations: घरभाडे भत्ता किंवा HRA जुन्या कर प्रणालीकडे लोकांना आकर्षित करणारी आणखी एक जमेची बाजू आहे. वाढत्या भाड्याने आणि बदलत्या कर रचनेच्या पार्श्वभूमीवर, 2026 च्या अर्थसंकल्पात HRA नियमांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पगारदार करदात्यांना लक्षणीय दिलासा मिळू शकेल. एचआरएमुळे पगारदार करदात्यांना कर सवलत मिळते आणि कमाल मर्यादा नसलेल्या काही सवलतींपैकी ही एक आहे.