स्टार असलात तरी नियम पाळावेच लागतील! वरुण धवनच्या 'त्या' स्टंटमुळे मुंबई मेट्रो प्रशासन संतप्त; पाहा काय घडलं?
‘बॉर्डर 2’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला अभिनेता वरुण धवन अलीकडेच आपल्या टीमसह मुंबई मेट्रोने प्रवास करताना दिसला. मेट्रोच्या डब्यात तो पुल-अप्स करण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. या व्हिडिओची दखल घेत मुंबई मेट्रो प्रशासनाने (MMMOCL) त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून तो पुन्हा शेअर करत अशा प्रकारचे स्टंट कायद्याने गुन्हा असल्याचे सांगत अभिनेत्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली., मनोरंजन News, Times Now Marathi