ठाकरे संपले म्हननारानी एकदा शांत डोक्याने वाचा मग समजेल सत्य काय आहे
ठाकरे 72–73 वर पोहोचणं म्हणजे पराभव नाही — तो सत्ताधाऱ्यांना दिलेला इशारा आहे
मुंबईत भाजप–शिंदे गट ११६ जागांवर पोहोचला आहे.
पहिल्या नजरेला हा आकडा मोठा वाटतो.
पण थोडं थांबून, थंड डोक्याने आणि प्रामाणिकपणे पाहिलं, तर हा आकडा विजयाचा नाही, तर अस्वस्थतेचा आहे.
कारण एक गोष्ट विसरता कामा नये—
ठाकरे गटाची ही लढाई पूर्णपणे शून्यापासून सुरू झाली होती.
चिन्ह चोरलं गेलं.
पक्ष फोडला गेला.
आमदार खासदार नगरसेवक शाखा प्रमुख
कार्यकर्ते फोडले गेले.
राज्य आणि केंद्र सरकारची संपूर्ण यंत्रणा वापरली गेली.
पैसा ओतला गेला.
दबाव टाकला गेला.
तरीही ठाकरे उभे राहिले.
आणि जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली.
या ७२–७३ जागांपैकी जवळपास ३५ नगरसेवक ‘निष्टावंत शिवसैनिक (जे विकले गेले नाही ठाम राहिले)तेआलेले आहेत आणि उरलेले ३५ पूर्णपणे नवीन, ताजे, चेहरे आहेत.
म्हणजे हा विजय कुठल्याही लोकलाटेविरोधात आलेला नाही,
तर सत्ताधाऱ्यांनी उभ्या केलेल्या अडथळ्यांवर मात करून मिळवलेला आहे.
दुसरीकडे पाहिलं तर—
अमाप पैसा
केंद्र + राज्य सरकारची ताकद
चोरलेले कार्यकर्ते आमदार खासदार नगरसेवक शाखा प्रमुख आयत केलेलं उमेदवार
बाहेरून आणलेले नेते
हे सगळं असूनही भाजप–शिंदे गट ११६ च्या पुढे जाऊ शकला नाही.
हा विजय नाही.
हा सत्तेचा घाम आहे.
हा सत्तेच्या माजाला बसलेला धक्का आहे.
आणि म्हणूनच हे स्पष्ट आहे—
म्हणजे ठाकरे यांचा हा विजय लोकलाटेचा आरसा आहे.
हा दबावाचा नाही,
हा पैशाचा नाही,
आणि हा सत्तेच्या कुठल्याही सौद्यांचा परिणाम नाही.
हा विजय आहे— डोळ्यात पाणी असलेल्या सामान्य माणसाचा,
न झुकलेल्या शिवसैनिकाचा,
आणि आजही बाळासाहेबांचा आवाज ओळखणाऱ्या मुंबईचा.
इतकं सगळं करूनही
जर विजय निसटता असेल,
तर तो विजय नसतो—
तो भविष्यासाठी दिलेला इशारा असतो.
🔥 म्हणूनच सांगावंसं वाटतं
🔥
मुंबई अजूनही ठाकरे चीच आहे.
✊🚩
जय महाराष्ट्र
बाळासाहेबांचा कडवट निष्ठावंत शिवसैनिक श्री पाटील....जय महाराष्ट्र..
#राजकारण #राजकारण #राजकारण #राजकारण #राजकारण