विजय जयसिंग पाटील
450 views
*‼️हे आयुष्य आहे; इथं झालेल्या चूका विसरून, परत नव्याने कामाला लागायचे असते ! कारण... भूतकाळ हा सतत डोक्यात ठेवला तर, आपला वर्तमानकाळ सुद्धा बिघडतो.*‼️🙏🌹❇️🌺💐🌻 *देवापेक्षा कर्माची भीती आपण अधिक बाळगावी, कारण देव एक वेळ आपल्याला माफ करेल पण कर्म कधीच माफ करत नसतं.* *वेळ आली तर तडजोड परिस्थितीशी करावी तत्वाशी नाही.* *मनापेक्षा अधिक सुपीक स्थान कुठलेच नाही, कारण तिथे जे काही पेरले जाते ते अधिकच वेगाने वाढत असते, मग ते विचार असो, द्वेष असो की प्रेम चांगले आहे ते पेराल याची निश्चित काळजी घ्याल.* *स्वतःच्या नजरेत परिपूर्ण असलं की जगाने आपल्याकडे कोणत्याही नजरेने बघू द्या काहीही फरक पडत नाही. आपण स्वतःकडे कशा नजरेने पाहतो, यावरच आपल्या आयुष्याची दिशा ठरते. जेव्हा माणूस स्वतःच्या नजरेत परिपूर्ण असतो, तेव्हा जगाने त्याच्याकडे कोणत्याही नजरेने पाहिलं तरी त्याला फरक पडत नाही. कारण त्याची मोजणी बाहेरून मिळणाऱ्या कौतुकाने किंवा टीकेने होत नसते, तर आतल्या समाधानाने होत असते.* *आपला रिकामा वेळ स्वतःला घडविण्यासाठी खर्च करा म्हणजे इतरांना दोष द्यायला वेळ मिळणार नाही.* *जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण लोकांच्या नजरा गरजेनुसार बदलतात.* *देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो, मग तो आधाराचा शब्द असो वा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात.* *३६ आकड्याचा विचार केला तर, तीन आणि सहा दोन्ही आकडे एकमेकांकडे पहात नाहीत. दोघेही टाईट पणाने पाठीला पाठ लावून उभी आहेत. एकमेकांचं तोंडही पहात नाहीत.* *त्याप्रमाणे माणसांच असतं. छत्तीसचा आकडा हा चाळिशीच्या आतला आहे. म्हणून चाळीशीच्या आत माणूस सुद्धा अहंकाराने, ताकदीने, पैशाने, परिपक्व असल्यामुळे तो नेहमीच अहंकारी असतो. कमीपणा घेत नाही. मला गरज नाही, मी त्याचं तोंड पाहणार नाही, असे शब्द त्याच्या तोंडात असतात. सख्ये भाऊ पक्के वैरी होतात. आणि हातात हात न घेता पाठीला पाठ लावतात.* *आता ६३ आकडा पहा. या आकड्याने साठी ओलांडल्या मुळे आता हे दोघेही नम्र झालेत. दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहतात. हातात हात घेतात. एकमेकाला आलिंगन देतात. माणसाचं असंच असतं. एकदा साठी ओलांडली की, नम्र होतो. कारण ना ताकद, ना तारुण्य, ना पैसा, ना सत्ता, काहीच राहत नाही. म्हणून हा नम्र होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी बालपण विसरतो, लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो, मुलं झाल्यावर भावांना विसरतो, पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो, आणि म्हातारपणी, जेवढ्यांना विसरला होता त्यांची आठवण काढत बसतो.* *६३ च्या या आकड्या प्रमाणेच संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.* *वयाने कोणी कितीही लहान-मोठा असु देत. वास्तवात तोच मोठा असतो, ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम, स्नेह व आदर असतो. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा.* *अनोळखी, अनोखी म्हणत असताना, अचानक एकमेकांची सवय होऊन जाणे म्हणजे मैत्री,* *!!सर्वांना राम कृष्ण हरी!!* *!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!* *श्री स्वामी समर्थ* *समाजातील प्रामाणिक, समाजसेवक, यांच्यावर प्रेम करा पण विश्वासघातकी, दगाबाज, खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, चुगलीखोर अश्या लोकांपासुन सावध व दूर रहा, कुठल्याही अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.* ‼️🌹🙏‼️🌹🙏‼️🌹🙏 #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग☀️ #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞