Davos
Davos - जागतिक आर्थिक मंचाच्या (World Economic Forum – WEF) वार्षिक परिषदेत महाराष्ट्राने केवळ सहभाग घेतला नाही, तर नेतृत्वाची भूमिका बजावली, असा ठाम संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. दावोस 2026 मधील महाराष्ट्राचा सहभाग हा राज्याच्या जागतिक पातळीवरील आर्थिक वाटचालीतील एक ऐतिहासिक टप्पा ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, दावोस 2026 परिषदेमुळे महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय गुंतवणूक नकाशावर प्रभाव अधिक मजबूत झाला आहे.