*विचार सुमने*
©️®️ *राजश्री (पूजा), कोल्हापूर* २४.०१.२०२६
*खरे तर या गोष्टी आपल्या आयुष्यात बऱ्याचदा घडत असतात. आपल्या दृष्टीने कदाचित त्या किरकोळही असतात पण त्यांचे परिणाम मात्र मोठे असतात.कधी कधी असंही होतं की कोणीतरी आपल्या सोबत खूप प्रेमाने बोलतं, काळजीने आपली विचारपूस करतो विचारतं, आपल्यासाठी वेळ द्यायला देखील तयार असतं… पण गमतीचा भाग हा आहे की मन तिथं थांबत नाही. कारण आपल्या मनाला प्रेम समजावून सांगता येत नाही. त्याला कोण योग्य आहे, कोण नाही हे तर्काने ठरवता येत नाही. मन फक्त ज्याच्यावर एकदा जडलेलं असतं, त्यालाच ते सर्वत्र शोधत राहतं. त्याच्या दृष्टीने बाकी सगळं झूट असतं. कधी कधी असंही वाटतं की आपण प्रयत्न करायला हवेत, पुढे जायला हवं, भूतकाळ मागे टाकायला हवा, आठवणींची गाठोडी फेकून द्यायला हवीत. पण प्रत्यक्षात मात्र तसं होत नाही. कुठल्या ना कुठल्या रूपात भूतकाळ आपल्या मानगुटीवर बसलेलाच असतो. म्हणूनच तर त्याला भूत म्हणतात नाही का..?*
©️®️ *राजश्री (पूजा)* #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #सुप्रभात #☕good morning Friends🌞