Samruddhi Chavan 💞
630 views
सह्याद्रीचा कणा कोसळला, महाराष्ट्र आज रडतोय, घराघरातला दादा आमचा, आज निरोप घेतोय... नव्हती कुणाला कल्पना, काळ असा येईल, वाघासारखा लोकनेता, पुन्हा कधी ना येईल...।।१।। शब्दाचा तो पक्का होता, कामाचा धडाका, प्रशासनाचा वाघ तो, ज्याचा बसला वचक मोठा... पहाटेच्या कामाची ती, सवय आता सुटेल, अजितदादांच्या शिस्तीचा, दरारा आता तुटेल...।।२।। बारामतीची माती आज, आसवांनी भिजली, राजकारणाची रणधुमाळी, आज पोरकी झाली... जनतेच्या या कैवाऱ्याचे, प्राण हवेत विरले, आठवणींचे डोंगर फक्त, आज मागे उरले...।।३।। विमान ते नसे काळ तो, झडप घालून गेला, महाराष्ट्राच्या भाग्याचा, एक तारा निखळला... अजितदादा नाव तुमचे, काळजात कोरले, तुमच्या विना हे राज्य आता, पोरके रे जाहले...।।४।। #viral भावपूर्ण श्रद्धांजली... अजितदादा, तुमच्या स्मृतींना मानाचा मुजरा! 🙏💐 #भावपूर्ण श्रद्धांजली 😭 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🎭Whatsapp status #follow