फार काही नको देवा...
इतक मात्र दे,
खिसा जरी रिकामी असला
तरी मनी स्वप्न जगू दे...
आम्हाला घडवताना
आई-वडिलांची हयात गेली,
स्वतःसाठी बघितलेली स्वप्न त्यांनी
आमच्यासाठी मारून नेली...
खमक्या अश्या या दोघांचा
आता आधार बनू दे,
फार काही नको देवा
इतक मात्र दे....
दुनिया खूप वाईट आहे रे...
हे सांगणारा ही शेवटी वाईट ठरतो,
मग विश्वास तरी कोणावर ठेवावा...
हा प्रश्न मागे उरतो,
दिव्यदृष्टी नको पण...
आपल्या माणसांची ओळख पटू दे,
फार काही नको देवा
इतक मात्र दे...
पडत चाचपडत चाललोय कुठेतरी...
दिशा काही दिसेना,
निभाव कसा लागावा आपला...
हे कोड अस सुटेना,
भरकटलेला पावलांना माझ्या
वाट नीट मिळू दे....
फार काही नको देवा
इतक मात्र दे....
- चकोर #motiv@tiv@tion@lk@tt@ #Motiv@tioň@l k@tt@ #motivation quote #boys life #boys life💔💔💔🥺🥺🤣💯💯🙌