बाबा घायवट
1.7K views
आई तु आमच्यातून निघून गेली....कायमची. तुझं गुण्या गोविंदाने नांदणार गोकुळ सोडून. तुझ्या चिमण्या तुझी वाट बघताय. तोंडावरून तु मायेचा हात फिरवण्याची. आज असंख्य आठवणीने मन गलबलून येतं. रोज दिसते....पण तु नाही ना ग दिसत. आम्ही सगळे शोधतोय ना ग तुला. अस वाटत कुठून तरी आवाज देशील , म्हणशील तु जेवली का कधी आली. खूप काळजी होती ना ग तुला माझी. तुझ्याकडे काही असण्याचा तुला कधिच गर्व नव्हता, आणी नसण्याच दुःख ही नव्हते. अगदि निस्वार्थ जीवन जगलीस. कायम आमच्या आयुष्यात साखर पेरत राहिलीस. ईश्वर भक्तीत कायम तल्लीन असणारी तु ह्या जगाचा निरोप घेतलास. खूप चढ उतार आणि सुख दुःख तु तुझ्या आयुष्यात बघितले. समर्थपणे तु कुटुंबाची मायेने काळजी घेतली. आणि माझी आई आता एका अनंत प्रवासाला निघून गेली, अगदी कायमची कधी न परत येण्यासाठी. तु नसली तरी तुझी मायेची उब कायम आमच्या सोबत राहील. शेवटी तु दाखवलेल्या सदमार्गांवर आम्ही चालत राहू. तु दिलेली तुझ्या आठवणी तशाच ठेवून गेली जणू तु आम्हाला देऊन गेली आमच्या आधारासाठी खूप आठवण येत आहे आई #👨‍👩‍👧‍👦आई-बाबा