💞SAMIRA💞143K
554 views
3 months ago
ज्यांनी आजवरच्या आयुष्यात मैत्री शब्दाचा खरा अर्थ समजावला आणि निभावला अशा प्रत्येक मित्र आणि मैत्रिणीसाठी दोन शब्द... मैत्री म्हणजे "तू" असं म्हणावं अशी नक्षत्रासारखी माणसं आयुष्यात मिळायला भाग्य लागतं. आपण त्यांना नाही तर ते आपल्याला निवडतात असंच म्हणायला हवं. मैत्रीचा हात जरी आपण पुढे केला तरी तो करताना मनातल्या अपेक्षांना जीवापाड जपून त्यांनी ती निभावलेली, टिकवलेली असते. इतर नात्यांप्रमाणे ह्या नात्यातही चढ उतार असतात, चांगल्या वाईट वेळाही असतात. व्यक्तीगत आयुष्यात असणाऱ्या दुःखांचा , वेदना, समस्यांचा फटका ह्या नात्याला खूप जास्त बसतो. हे नातं जितकं सक्षम तितकंच हळवं त्यामुळे कुठला घाव ह्याची शकलं उडवेल सांगता येत नाही. पण अशा विपरीत परिस्थितीतही स्वतः दिपस्तंभासारखं अढळ राहून आयुष्याची ती वेदनादायी फेज पार करायला मदत करणारे खरे मित्र म्हणजे देवाचा आशीर्वादच.... फक्त आनंद नाही तर संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या म्हणून सक्षमतेने उभा रहाणारा, वाद झाला, चुकीचा शब्द गेला तर जरी दुखावला तरी क्षमा मागितल्यावर चटकन माफ करणारा... आणि सगळ्यात #🤘मैत्री स्टेट्स #🤩Dear Bestie #🤩खरी मैत्री #😘कट्टर मैत्री महत्त्वाचं एकदा मैत्री केल्यानंतर आपण जसे आहोत तसं स्विकारणारा, आपलं हसू किती खरं आणि किती खोटं हे न सांगताच ओळखणारा...तो खरा "सखा" अशा माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना "मैत्री" दिवसाच्या मनापासून शुभेच्छा.... असेच सोबत रहा...🧡🌹🍫🤗