#🗓️छत्रपती शाहू महाराज जयंती 🚩
गंगाराम कांबळेंना चहाचे दुकान काढण्यास शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिले, ते स्वत: या दुकानात जात व "गंगाराम चहा आण" अशी ऑर्डर पुकारीत, महाराज चहा घेऊ लागल्यामुळे सोबतच्या मंडळींनाही चहा घेणे भाग पडे. हाताशी असलेली राजसत्ता दलितांच्या वस्त्या सुधारू शकत नसेल तर त्याचा उपयोग काय ? याची जाणीव असलेला लोकराजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज. जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन राजे...❤️💐🙏