फॉलो करा
$hriya ❣️❣️
@007queen
9,921
पोस्ट
62,630
फॉलोअर्स
$hriya ❣️❣️
633 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
https://marathi.pratilipi.com/series/त्रियाचरीत्र-चारित्र्यहीन-भाग१-2jzdyrgbt6wz?language=MARATHI&utm_source=android&utm_medium=shareगिरीश अजूनही तिच्याकडे पाहत असतो. अर्धवट जागा, अर्धवट मोहित झाल्या सारखा. तो हळू आवाजात म्हणतो….“मला जागवायचं होतं… की त्रास द्यायचा होता?” #माझ्या कथा #✍मराठी साहित्य #मराठी लेखिका #हृदयस्पर्शी मराठी कथा #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 मृण्मयी किंचित हसते, खांदे उडवत.....“असं झालं… नकळत. थोडे पाण्याचे थेंब पडले बस्स.” कसतरी बोलली आणि थंड उसासा सोडला. गिरीश सोफ्यावरून थोडा वर उठतो...“नकळत? असं नकळत करणारे लोक धोकादायक असतात." मृण्मयीचं हसू अजून गोड होतं....“अच्छा?तर मी धोकादायक आहे?” हाताची घडी घालून तिने विचारलं. तो तिच्याकडे पाहत राहतो. हसत, पण त्या हसण्यात एक आकर्षण जाणवत होतं....“हो, विशेषतः अशा सकाळी…ओल्या केसांसोबत.” मृण्मयी टॉवेल हातात फिरवत थोडी मागे सरकते, पण तिच्या डोळ्यांत खोडकर चमक. मृण्मयी....“मग कुठून सुरू करायचं आवरायला? ओले केस… की तुमचा चिडलेला चेहरा?” गिरीश....“दोन्ही आवरायला लागतील असं दिसतंय.” त्यांच्यात थोडीशी शांतता पसरते. पण ही शांतता गोड होती, हवीहवीशी वाटणारी. एकमेकांना पुन्हा जवळ ओढणारी. त्या क्षणात त्याने काहीच विचार न करता तिचा हात पकडला...“अरे, गिरीश…!” तिला काही समजायच्या आत त्याने तिला स्वतःकडे जोरात खेचलं. ती क्षणात त्याच्या छातीवर येऊन पडली. त्याचा एक हात तिच्या कमरेवर घट्ट स्थिरावला होता. दुसरा हात तिच्या गालाला स्पर्श करत वर सरकला. तो हलक्या, परंतू खोल आवाजात म्हणाला,...“सकाळी सकाळी हार्ट अटॅक देऊन मारायचा प्लॅन आहे का तुझा?” मृण्मयीचा श्वास अडकला. तिच्या चेहऱ्यावर त्याच्या श्वासाची उष्णता आली. त्याच्या बोटांच्या स्पर्शाने पाठीवरून एक हलकी शिरशिरी पसरली. मृण्मयी....“मी… मी काहीच नाही केलं,” ती अडखळत म्हणाली. गिरीश...“हूं… काही नाही?” तो तिच्या केसांतून एक थेंब पकडत म्हणाला,,“मग हे थेंब माझ्या चेहऱ्यावर कसे आले? पावसाने टाकले काय?”
See other profiles for amazing content