#जन्म #ज्याचे #घ्यावे #कुळा
आराडी ही पण मनुष्य म्हणून च जन्माला येतात पण आपला समाज त्याना कधीच माणूस म्हणून स्वीकारत नाही कारण ते आपल्या सारखे नसतात ते समोरून जरी आले तर लोक वाट बदलतात अशी तर आपली मानसिकता आहे आपण घरात हौस म्हणून कुत्री मांजर पाळू त्याला खायला घालू पण जिवंत माणसाला एक रुपयापण देणार नाही काय हो ती काय माणसं नाही भगवंताने त्यांना वेगळं रूप दिल एवढं च वेगळं आहे त्याचा ही इतिहास आहे तो समजून घेतला तर तुम्हाला ही कळेल शंकराने पार्वती मातेच्या
समोर नारीचा वेष घेतला त्याच वेळी राजा इल हा तिथे शिकारी साठी गेला होता त्या जंगलात जे पशू पक्षी प्राणी जीव जँतु सगळेच त्यावेळी स्त्री रुपात बदलले तसेच राजा इल सुध्दा बदलला राजाला खूप वाईट वाटले म्हणून त्याने महादेवाला परत पुरुष रुपात बदल करा अस सांगितले पण देवाला ते नाही जमल म्हणून राजा पार्वती मातेकडे गेला माता म्हणाली की जर महादेव काही करू शकत नाही तर मी काय करणार मी तर त्यांची अर्धांगिनी आहे मी तुला माझं अर्धांग देऊ शकते पण अट्ट एकच की तू एक महिना स्त्री आणि एक महिना पुरुष अस राहशील बघ नाही तर मग कायम असाच राहा मग राजाने विचार केला आणि ठीक आहे म्हणाला त्यावेळेपासून राजा एल हा एक महिना राजा इल आणि नंतर एक महिना इला म्हणून जगला आणि आराडी हे ब्रम्हदेवाने जन्म दिलेले अपत्य आहे त्यामुळे त्यांचा अपमान हा ब्रम्हदेवाच अपमान आहे ते तुम्हाला चार पैसे फक्त मागतात कारण त्यांच तेच काम आहे आज त्यांच्या मध्येही कित्येक जण प्रगती करत आहेत शिकत आहे त्यांचा आशीर्वाद हा लाखमोलाचा आहे आपण माणूस म्हणून जगतो त्यांनाही तो अधिकार द्या🤔🤔🤔
#🙏 प्रेरणादायक बॅनर