फॉलो करा
दिल की बात
@186564851
22,994
पोस्ट
47,673
फॉलोअर्स
दिल की बात
621 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
*Jayous life* शुभेच्छानंदी आणि समाधानी माणसं दुर्मिळ झाली आहेत... कोणाशी जरा बोलायला जा, तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा ‘माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’.... आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत... काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे... पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय Isn't it strange ? मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ? सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ? आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ? पाऊस पडतोय ? सोप्पं आहे - भिजायला जा ! अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला 'मूड' लागतो ? माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.... परमेश्वराने एका हातात *'आनंद'* आणि एका हातात *'समाधान'* कोंबून पाठवलेलं असतं.... माणूस मोठा होऊ लागतो, वाढत्या वयाबरोबर 'आनंद' आणि 'समाधान' कुठे-कुठे सांडत जातात.... आता 'आनंदी' होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.... कुणाच्या येण्यावर... कुणाच्या जाण्यावर... कुणाच्या असण्यावर... कुणाच्या नसण्यावर... काहीतरी मिळाल्यावर... कोणीतरी गमावल्यावर... कुणाच्या बोलण्यावर... कुणाच्या न बोलण्यावर... *खरं तर,* *'आत' आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय....* कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं... इतकं असून... आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत, पाण्याच्या टँकरची वाट बघत... जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !.... इतरांशी तुलना करत आणखी पैसे, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची 'पोजिशन', आणखी टक्के.. ! या 'आणखी' च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती लांब आलो आपण !.... *आपण सारेजण नेहमी आनंदी राहू आणि संपर्कातील सर्वांना आनंदी ठेवण्याचा संकल्प करू.* 🌹🙏🏻_ #कविता
दिल की बात
553 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
माणूस सुद्धा दिवाळीच्या फराळासारखा असतो. काही माणसं चिवडया सारखं सगळीकडे बेमालूमपणे मिसळणारी . काही चकली सारखं स्वतःमध्येच गुरफटलेली असतात.आत्ममग्न असतात. काही लाडू सारखी खुशाल चेंडू असतात.जिथे जातील तिथे गोडवा निर्माण करतात. काही शेव सारखी स्वतःची गुंतागुंत करून कुठून बोलायला सुरुवात करावी हे न कळणारी असतात. काही करंजी सारखी बाहेरून चव नसलेली पण एकदा का त्यांच्या अंतरंगात पोहचली की सारणासारखी गोड गोड असतात. अशी सर्व माणसं एकत्र आली की जे तयार होते, त्याला मनुष्य स्वभावाचा फराळ म्हणतात. तो ज्याला खायला जमतो त्यांने आयुष्याची दिवाळी साजरी केली असं म्हणतात... *दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन* 💐 #✨शुभ दीपावली🪔
दिल की बात
603 जणांनी पाहिले
15 दिवसांपूर्वी
🤣🤣🤣 कोई 27 साल पहले अनिल कपूर श्रीदेवी और उर्मिला मातोंडकर की फिल्म आई थी जुदाई। . . . इसमें उर्मिला अनिल को पसंद करने लगती है और उसे हासिल करने के लिए श्री देवी को 2 करोड़ रूपये ऑफ़र करती है.. . . जिसे श्री देवी स्वीकार कर अनिल की शादी(दूसरी) उर्मिला से करने को तैयार हो जाती है.. . . आज अख़बार में .. भोपाल की एक खबर छपी है.. . जिसमे एक 52 वर्षीय महिला का दिल अपने सहकर्मी 42 वर्षीय पुरुष पर आ गया जिसके दो बच्चे भी है.. उसने परिवार न्यायालय में काउंसलिंग के दौरान . एक 90 लाख का डुप्लेक्स मकान 80 लाख की ऍफ़ डी और 1 प्लाट जिनकी कुल कीमत लगभग सवा दो करोड़ होती है के बदले में पहली पत्नी से उसके पति को खरीद लिया .. . इस घटना से .. यह प्रमाणित होता है .. कि 1997 से लेकर .. आज तक ... . . विवाहित पुरुषो की कीमत में कोई ख़ास वृद्धि नहीं हुई है.. 🤣🤣🤣 . . 1997 में अनिल कपूर 2 करोड़ में बिके थे.. 2025 में भोपाल वाले भाई साहब .. सवा 2 करोड़ में बिके ... 😢😢 . . इस खबर को पढ़ कर .. ग्रुप के कुछ पुरुषों का कहना है .. कि पैसों की कोई बात नहीं *पहले कोई ऑफ़र तो आये..* 🤣😁😁😄😄😉 #हास्य
दिल की बात
807 जणांनी पाहिले
28 दिवसांपूर्वी
रंगांच्या मोहात अडकलेली ती… तिला कधी जाणवलंच नाही, की तिच्या जीवनाचे खरे रंग तर हिंदू कोड बिलात सामावले आहेत— पहिला — शिक्षणाचा दीपस्तंभ, दुसरा — वारसाहक्क व संपत्तीची ओळख, तिसरा — सामाजिक व वैयक्तिक स्वातंत्र्याचा श्वास, चौथा — मतदानाचा सामर्थ्यदायी हक्क, पाचवा — समान वेतनाची समानता, सहावा — लैंगिक व शारीरिक सुरक्षिततेचे कवच, सातवा — मातृत्व रजेचा सन्मान, आठवा — गर्भधारणेवरील स्वायत्ततेचा हक्क, नववा — रोजगारातील समान संधीचे आकाश. बघ ग, बये… एकदा तरी डोळे उघडून— हे नऊ रंग तुझ्या अस्तित्वाचे! तू नेसलेल्या साड्यांच्या रंगांपेक्षा कितीतरी गडद, कितीतरी मौल्यवान. त्यांना ओळख, त्यांचा सन्मान कर, आणि बघ— तुझं आयुष्य कसं उजळून निघेल… लखलखत. ✨ #कविता
दिल की बात
554 जणांनी पाहिले
28 दिवसांपूर्वी
--- *मी कोण?* नोकरी संपली, दिनक्रमही गेला, घरातली गजबजही थांबली, आणि शांततेच्या प्रतिध्वनीत मी स्वतःला शोधायला लागलो. मी कोण? बंगलो बांधले, फार्महाऊस उभारले, मोठी-लहान गुंतवणूक केली, आणि आता? चार भिंतीत अडकून पडलोय. सायकलवरून मोपेड, मोपेडवरून मोटार, मोटारीतून गाडी, गती आणि स्टाईलच्या मागे धावलो, पण आता? हळूहळू पाय रेंगत रेंगत आपल्या खोलीतच फिरतोय. निसर्गाने विचारलं— “कोण आहेस रे मित्रा?” मी म्हणालो, “मी... फक्त मीच.” राज्य, देश, खंड फिरलो, पण आज माझे प्रवास हॉलपासून स्वयंपाकघरापर्यंतच. संस्कृती, परंपरा जाणून घेतल्या, पण आता माझ्या कुटंबाने मला समजून घ्यावं अशी इच्छा आहे. निसर्ग हसून म्हणाला— “कोण आहेस रे मित्रा?” मी उत्तर दिलं, “मी... फक्त मीच.” पूर्वी वाढदिवस, लग्नसमारंभ मोठ्या थाटामाटात केले, पण आज फक्त छान झोप लागली, भूक लागली, हेच साजरं करतो. सोने, चांदी, हिरे, मोती सगळं बँकेत गप्प बसलंय. सूट-बूट कपाटात लटकलेले. आता फक्त मऊ सूताचे कपडे, साधेपणातला आराम. इंग्रजी, फ्रेंच, हिंदी शिकलो, पण आता माझ्या मायबोलीतच सुख मिळतं. व्यवसायासाठी जगभर धावलो, नफा-तोट्यांची गणितं केली, पण आज फक्त आठवणींमध्ये हिशोब करतो. व्यवसाय सांभाळला, कुटुंब जोडलं, खूप नाती केली, पण आता? शेजारचा साधा-सोपा माणूसच माझा जिवलग सोबती आहे. नियम पाळले, शिक्षण घेतलं, पण आता कळतंय— खरं महत्त्वाचं काय आहे. जीवनाचे चढउतार अनुभवून, शांत क्षणी माझ्या आत्म्यानेच मला सांगितलं: “पुरे झालं आता… तयार हो प्रवासी, अंतिम प्रवासासाठी…” निसर्ग पुन्हा हसून विचारतो— “कोण आहेस रे मित्रा?” मी हळूच म्हणतो: “अरे निसर्गा, तूच मी… आणि मीच तू. एकेकाळी आकाशात झेपावलो, आता जमिनीलाही प्रेमाने स्पर्शतो. मला माफ कर… एकदा पुन्हा जगू दे मला— पैशाच्या यंत्रासारखा नव्हे, तर खराखुरा माणूस म्हणून— मूल्यांसह, कुटुंबासह, आणि प्रेमासह.” 🍀 *“वरिष्ठ नागरिकांना समर्पित — प्रेम, बळ आणि शांतीच्या शुभेच्छा.”* #🙏 प्रेरणादायक बॅनर
दिल की बात
3.4K जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
|| एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा || येणार आहे असे त्या पुजार्‍याला कळले... || त्याने सहा हजार रुपयांचे कर्ज काढले आणि || देऊळ चांगले सजवले रंगवले. || राजा पूजेला आला आणि त्याने दक्षिणा म्हणून || चार आणे ठेवले पुजार्‍याला तिथेच घाम फुटला. || आपण सहा हजार कर्ज काढून मंदीर रंगवले || आणि राजाने फक्त चार आणे दक्षिणा ठेवली... || आता या चवण्णीछाप राजाला अद्दल घडवायचीच. || पुजारी हुशार होता. राजा गेल्यावर पुजार्‍याने ते || चार आणे मुठीत घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला. || राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे. || ती मला झेपणार नाही. म्हणून मी तिचा लिलाव || करतोय आपापली बोली लावा. || आता राजाने वस्तू ठेवलीय म्हणल्यावर साधी || ठेवली असेल का ? पहिलीच बोली दहा हजार || पासून सुरु झाली. पुजारी डोके हालवूनच || 'नाही परवडत' असे म्हणत होता. लिलावातील || बोली वाढत वाढत पन्नास हजारावर पोचली. || तिकडे राजाला पहारेकरी म्हणाला, महाराज, || पुजाऱ्याने आपण मंदीरात दान केलेल्या वस्तूचा || लिलाव सुरु केला आहे आणि ती वस्तू तो || दाखवतही नाही आणि सांगतही नाही, || मुठीत ठेवलीय............ || राजाला घाम फुटला. तो पळत पळत आला || आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवून || म्हणाला, "हे माझ्या बाप्पा, सव्वालाख देतो पण || कुणाला ती वस्तू दाखवू नको.... || तेव्हा पासून ही म्हण रुजू झाली.... || झाकली मूठ...... 🤛 सव्वा लाखाची............ || सहज आठवल म्हणून पाठवल...... 😂 🤣 😂 #गंमत जंमत.
See other profiles for amazing content