Electric Truck, Blue Energy Motors
भारतातील वाहतूक क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात करणारा BEM 5548 EV (Electric Truck) हा देशाचा पहिला इलेक्ट्रिक हेवी-ड्युटी कार्गो ट्रक ठरला आहे. ब्लू एनर्जी मोटर्स (Blue Energy Motors) यांनी विकसित केलेला हा ट्रक केवळ पर्यावरणपूरक नसून तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि ताकदीचं अद्वितीय मिश्रण आहे. ५५ टन क्षमतेचा हा ट्रक भारतात बनवलेला पहिला “मॉड्यूल-टू-ब्रॅकेट बॅटरी (M2B)” तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक वाहन आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक बॅटरी स्वॅपिंग सिस्टममुळे काही मिनिटांत याची बॅटरी (उर्जा) बदलता येते. हा ट्रक BEAT (Blue Energy Advanced Technology) प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आला असून तो भारतीय रस्ते, हवामान आणि औद्योगिक वापरासाठी खास डिझाइन केला आहे. ४८० एचपीच्या शक्तिशाली मोटरसह, २४०० एनएम टॉर्क व २०० किमीपर्यंत रेंज असलेला हा ट्रक, मालवाहतूक क्