कपड्याच्या दुकानावर बापाने घरदार बांधले.मुलगा म्हणायचा पप्पा मी येऊका दुकानात तुम्हाला मदत करतो पप्पा म्हणायचे नको लोक नाव ठेवतील.
पोराच शिकायच वय आणि त्याला दुकानावर बसवले माल आणायला कधी सोबत नेले नाही.पाचीकशे रूपये देऊन दुकानातलाच एखादा नोकर नेत..
पुढे अचानकपणे बापाचे निधन होते.
संपुर्ण जबाबदारी मुलावर येते माल कुठुन आणायचा माहिती नाही.दुकानातला नोकर सोबत नेला त्याने तिथे फोन करून सांगितले माझे कमीशन काढा.
. दुकानात मुलगा बसु लागला नोकर लोक मित्र कंपनींना उधार देत.
पुढे नोकर लोकांनी काढलेले कमीशन तो नसताना विकलेला माल अशा अनेक कारणांमुळे मुलाची दुकान बंद पडते आणि नाविलाजाने जो स्वतःची दुकान होती तो दुसऱ्या च्या दुकानात कामाला जाऊ लागला..
बापाने कमावलेल वाढवायच असत स्वाभिमान असो बिझनेस असो शेती असो काहीही असो...
मुलगा कुचकामी ठरला याला कारणीभूत आपल्या मराठी लोकांचे विचार...
मारवाड्याच पाचवीच पोरग दुकानावर काउंटर सांभाळते.
नोकरांकडून कामे करून घेते
हिशोबात एक रुपयाची चुक होऊ देत नाही..
आणि त्यांची पोर गणितात खुप पक्की असतात..
आता आपल्या बापाकडे एखादी कला असेल तर तो म्हणतो आत्ता पासून च पोराला कामाला लावून लोक मला नाव ठेवतेन..
म्हणजे ते दोन दोन तिन तिन तास उनाड पोरात खेळत फिरत ते चालत पण माझ्या पोराला आत्ता पासून च काम नको आस बापाला वाटत..
सगळ्यात जास्त काळजी वाटते लोक काय म्हणतील..
लोक हे हसायला असतात
पोसायला नाही..
तुमच्या घरी खायला भाकरी नसेल तर लोक आणून देणार नाहीत.
आणि दिले तरी उपकार म्हणून देतील आणि लाचार समजून गावभर बदनामी करतील..
भावांनो आपल्या कडची कला आपल्या लेकरांना द्या माणसाचा क्षणाचा भरोसा नाही..
तुम्ही कीती कमावले तरी साठवलेले संपत असते.. साचलेले डबक कधीपण आटते..
म्हणून पोरांसाठी कमवून ठेवण्या पेक्षा आपल्या पोरांना कसे कमवायचे ते शीकवा..
तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेला संघर्ष मुलांना सांगा..एक एक पैशासाठी घेतलेली मेहनत सांगा.. त्यांना सुद्धा पैशाचे महत्त्व कळू द्या..
खर्चायला शंभर रुपये देताना शंभर चे दोनशे कसे करता येतील याच ही ज्ञान द्या..
आणि म्हणूनच जगात पैशापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे 🙏🙏🙏🙏🙏
लेख आवडल्यास मित्र मैत्रिणींनो नातेवाईकांना शेअर करा 🙏
🙏🙏 धन्यवाद 🙏 🙏
. #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑 #🙂Positive Thought