फॉलो करा
ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
@apparaje100
38,333
पोस्ट
82,461
फॉलोअर्स
ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
560 जणांनी पाहिले
7 तासांपूर्वी
"बाप " म्हणून एक अतिशय सुंदर कविता आहे .त्याचे कवी कोण आहेत ते मला माहीत नाही . कदचित तुम्ही ही कविता ऐकली असेल जर नसेल ऐकली तर जरूर वाचा हा माझा आदेश किंवा नम्रतेची विनंती म्हणून नाही तर तुमच्या बाबांसाठी वाचा... ● बाप ● बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा त्याच्या काळजात सुद्धा लाजालुची संवेदना त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबना हिर्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया आई कलस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसलते घर उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी घर बायकोनी मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडापीसा एका - एका पैशासाठी बाप म्हणजे जणू की वाल्याकोल्याची जमात ज्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा बाप साठवतो आश्रू वाट पाही त्या क्षणांची जन्म भराचे रडतो लेक जाताना सासरी ज्याने जपले मुलांना तळहाती पाकल्यात अशा बापासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात बाप थकल्यावरती त्याचा बनावे आधार नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर बाप म्हणजे असे की एक झाडचअबोली बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त माऊली...🙂❤😊🙏🏼 #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #👨‍👩‍👧‍👦आई-बाबा #😇माझे बाबा माझे खरे मित्र💖 #🤴माझे बाबा
ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
769 जणांनी पाहिले
20 तासांपूर्वी
🙏श्रध्दा🙏 साधारण आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी विनावाहक विनाथांबा अशी सांगली कोल्हापूर बससेवा सुरू होती. बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली. नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बसला बर्‍यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी 65 ते 70 वर्षाची वृद्ध महिला बसली होती. तिच्या पेहरावावरून ती सांगलीच्या कुठल्यातरी खेडेगावातनं आली होती हे कळत होतं. गाडी सुरू झाली. खिडकीतून येणारं गार वारं मनाला आनंद देत होतं. साधारणतः हातकणंगले ओलांडल्यानंतर आजी मला म्हणाल्या, *"व्हय दादा, मास्तर बरं न्हाय आलं अजून?" मास्तर मंजे कंडक्टर.* मी म्हटलं आजी, ह्या गाडीला मास्तर नसतंय. गाडीवर लिव्हलया की तसं. *आरं देवा... मंग तिकीट??* त्ये खालीच, ST मध्ये बसायच्या आधीच काढायचं असतंय. *मग आता???* "तिकीट तपासायला वाटेत कुणी चढलं, आणि पकडलं तर दंड भरावा लागेल. तरी पण आपण समजावू त्यांना की वाचायला नाही येत, त्यामुळं चढल्या तुम्ही." *"दुसरी इयत्ता पास हाय म्या. म्होरंबी शिकले असते,पण बानं चुली पुढं बशीवलं.* *त्ये मरुदे तिकडं. वाचाय येतंया मला.* *सांगली कोल्हापूर पाटी बघूनच तर चढले. गडबडीत बाकी न्हाय वाचलं."* "अहो आज्जी. आपण फक्त सांगू तसं. असंबी त्ये बेंन कुणाचं काय ऐकत नाहीत, तरिबी उगा वाईच खडा टाकून बघू. त्येबी, तपासणीसाठी आले तर मग बघू..." दोन मिनिटं म्हातारी काहीच बोलली नाही. डोक्यावरचा पदर सावरत, हळूच म्हणाली, *"नशिबी गरिबी पूजल्या, त्ये परवडलं, पण अडाणीपणाचा शिक्का लई बेक्कार."* ह्या सगळ्या झांगड गुत्त्यात गाडी केव्हा कोल्हापूर स्टॅण्ड मध्ये शिरली कळलंच नाही. मी खिडकीतून डोकावून पाहिलं, बाहेर कुणी तपासनीस नव्हता. आजीला म्हटलं, "आज्जी, आता सुमडीत उतरा. अन हिकडं तिकडं न बघता लगेच स्टँडच्या भैर पडा." आजी कैच बोलली नै. बाहेर आल्यावर मी गाड्यावर मस्त चहा मारला. तेवढ्यात पुन्हा आज्जी दिसली. म्हंटलं... "आज्जी अजून इथंच?" *आज्जीनं चोळीत खुपसलेलि पर्स काढली, त्यातून एक तिकीट बाहेर काढलं आणि माझ्या हातात दिलं.* आज्जीनं उतरल्यावर कोल्हापूर सांगली असं तिकीट विना वाहक विना थांबाच्या काऊंटर वरनं काढलं होतं. मला म्हणाली *"टाक फाडून. म्या भैर आल्यावर फाडणारंच व्हते.* *माघारी जाताना मात्र, न इसरता आधी तिकीट काढील."* म्हटलं, आज्जी.... "पैकं जास्त झालं असतील तर नाष्टा द्या हॉटेलात..." आज्जी हसली.... *म्हणाली "जिच्या दर्शनाला आले, त्या अंबा बाईनं तिची जबाबदारी पार पाडली.* *कुठलं गालबोट नं लावता आणलं इथवर. वाटेत उतरवलं असते मला, पकडलं गेले अस्ते तर. पण त्या अंबा बाईनं चार चौघात लाज राखली.* *दंड भराय इतकं पैकं न्हाईत पण मग आता म्या किमान हाय तेव्हढं तिकीट काढून, फाडून टाकलं म्हंजे झालं की रं हिशेब बराबर....आता जाताना मात्र इस्रायची न्हाई तिकीट काढायला.* *महालक्ष्मीच्या दारात जायचं अन त्येबी कुणाची तरी लक्ष्मी लुबाडून... हे बरं न्हाई ..."* मी काहीच नं बोलता हातातलं तिकीट फाडून टाकलं. आज्जी गेली अंबाबाई च्या दर्शनाला. मी मात्र तिथनंच हात जोडले. #अंबाबाई #मोहटादेवी #क्षी मोहटादेवी 🌺🙏🌺 #श्री मोहटादेवी मंदिर ता.पाथर्डी जि.अहमदनगर #🙏🏻आई मोहटादेवी *ढीग इयत्ता गिरवल्या तरी ही अशी नीतिमत्ता येतेच असं नाही, हेच खरं.* (सत्य घटनेवर आधारीत) 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
813 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
🌧🌧🌧🌧🌧 *मलाही दिवाळी पहायची आहे* या वेळेस पाऊस म्हणाला मी परत नाही जाणार ,😏 दिवाळीची मजा मी पण अनुभवणार ...🤗 मी आल्यावर लोक करतात नुसते उपास अन् तापास, 🙃 कधीच मिळत नाही मला लाडू चिवडा चकल्यांचा वास...🙁 वास घेऊन पदार्थांचा जेव्हा होईल मी तृप्त, 😌 मगच ठरवलय मी ह्या थंडीत होईल लुप्त... 🌫 चातुर्मासातला फराळ म्हणजे साबुदाणा अन् भगर, 😖 त्याला कशी येणार दिवाळीच्या फराळाची सर... 🤨 छत्री -रेनकोट बघून बघून मी ही कंटाळलोय, 😩 दिवाळीचे नविन कपडे बघायला मी थांबलोय ...😍 म्हंटल होत आपणही कुर्रम- कुरम मस्त चकली खाऊ, 😉 पण माझ्या अनपेक्षित थांबण्याने तीही होईल मऊ - मऊ ...😒 लाडू बसला फुगून करंजी बसली गुरफटून, 👿 "अतिथी देवो भव" सारेच कसे गेले विसरून... 🤔 मला बघून सारेच जण हिरमुसून बसले, 😼 उदास चेहरे बघून त्यांचे मलाही रडू फुटले... 😭 बघायचा होता मला तो फटाक्यांचा धूर, 🎆 पण रडण्याने माझ्या आला नदीला परत पूर... 🌊 शेवटी लोकांनी ठरवले कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहायचे, 💃🏽🕺🏼 चकल्या नाही तर नाही कांदा-भज्यांवरच दिवाळी करायचे... 🎊🏮🌷🍀🌷🍀🌷🍀 #पाऊस #बरोबर आहे ना मित्रांनो लाखात एक सत्य💯🔥☝🏻 #Life is not ones more. 🙏जीवन एक सत्य #पाऊस
ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
648 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
【सिझर करण्यासाठी सांगितली जाणारी ४ कारणं.】 १.बाळाच्या गळ्याला नाळेचे वेढे आहेत.👇 -सिझर करायला हवं ‘‘बाळाच्या गळ्यात नाळेचे वेढे आहेत’’ असं डॉक्टर अनेकदा सांगतात. आणि सिझर करायला चटकन राजी होतात. पण हे खरं नव्हे. पोटातील बाळाला प्राणवायूचा आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा नाळेवाटे होत असतो. गर्भातील बाळाची फुफ्फुसे तयार झालेली नसतात (जन्मल्यावर बाळ पहिल्यांदा श्वास घेते, तेव्हाच फुफ्फुसाचे कार्य सुरू होते). त्यामुळे नाळेचे हजार वेढे जरी बाळाच्या मानेभोवती पडले, तरी नाळेतून होणारा रक्तपुरवठा कायम असल्याने बाळाला काहीही त्रास होण्याचा प्रश्नच नसतो. वस्तुत: गर्भाशयातील पाण्याच्या डोहात मनसोक्त फिरत असताना बाळाच्या मानेभोवती नाळेचे वेढे पडणं, ही पूर्णपणे नैसर्गिक क्रिया आहे. नैसर्गिक प्रसूती होताना हे वेढे प्रसूती समयी जवळ असलेल्या डॉक्टर अथवा परिचारिकेला नेहमीच दिसत असतात आणि बाळाला त्यामुळे कधीही काहीही त्रास होत नाही. २.गर्भाशयातील पाणी कमी झालंय.👇 -गर्भाशयातील पाणी कमी होतंय आणि बाळ कोरडं पडतंय हे सिझरचं दुसरं कारण. हे कारण सुद्धा पहिल्या कारणाइतकंच तकलादू आहे. गरोदरपणातील नऊ महिन्यांपैकी पहिल्या सात महिन्यात बाळाची वाढ कमी आणि पाण्याची वाढ जास्त असते. या उलट सातव्या महिन्यानंतर गर्भाशयात बाळ वेगाने वाढू लागतं आणि पाणी त्याप्रमाणात कमी होऊ लागतं. याचाच साधा अर्थ असा की, गर्भाशयातील पाणी कमी होण्याची प्रक्रिया प्रसूतीच्या दोन महिने अगोदर सुरू झालेली असते. बरेचदा, प्रसूतीच्या कळा सुरू होण्यापूर्वी पाणमूठ फुटून गर्भाशयातील बरंच पाणी निघून जातं आणि त्यानंतर 24 तासात नैसर्गिक कळा सुरू होतात. काही वेळा, दिवस उलटून गेल्यावर कळा सुरू करण्यापूर्वी पाणमूठ फोडणं हा पूर्वापार चालत आलेला उपाय आहे. यात अनैसर्गिक असं काहीही नाही. बाळ कोरडं पडेल, हे डॉक्टरांच्या अचाट कल्पनाशक्तीचे उदाहरण आहे. या व्यतिरिक्त त्या विधानाला काहीही अर्थ नाही. ३.बाळानं पोटात शी केली.👇 -प्रसूतीची प्रत्येक कळ बाळाला गर्भाशयातून खाली ढकलण्यासाठी आणि गर्भाशयाचे तोंड उघडण्यासाठी असते. बाळाच्या पोटावर या क्रियेने दाब पडला, की बाळाला शी होणं ही अशीच नैसर्गिक क्रिया आहे. उलट अशी शी होणे, हे बाळाचे गुदद्वार आणि आतडी पूर्णपणे विकसित आणि नॉर्मल असल्याचे लक्षण आहे. ही विष्ठा जंतु विरहित असते. त्यामुळे बाळाने अशी शी गिळली, तरीही त्याला या शी पासून काहीही धोका नसतो. बाळाच्या जन्मानंतर लगेचच सक्शन मशिनने ही शी बाहेर काढून टाकण्याची पूर्वापार पद्धत आहे. पण बाळानं पोटात शी केली हे कारण सांगून हल्ली सर्रास सिझर केलं जातं. ४.बाळाचे ठोके अनियमित झाले आहेत.👇 -गर्भाशयाच्या प्रत्येक आकुंचनाबरोबर बाळाचा रक्तपुरवठा कमी होत असतो; बाळाचे ठोके अनियमित होत असतात. दोन कळांमधील काळात हा रक्तपुरवठा आणि ठोके पूर्ववत होतात. ही क्रिया बाळाचा जन्म होईस्तोवर चालू असते. कळा सहन करण्याची बाळाची ताकद अमर्यादित असते, हे सत्य प्रसूती प्रक्रियेस मदत करताना मी हजारो वेळा अनुभवलेले आहे. दोन दोन अथवा तीन तीन दिवस घरी कळा देऊन नंतर माझ्याकडे येऊन नैसर्गिक प्रसूती झालेल्या बाळाची तब्येत आणि रडणं खणखणीत असते. त्यामुळे बाळाचे ठोके अनियमित झालेत असं सांगणं हेदेखील एक फसवं कारण आहे. संदर्भ व सौजन्य : डॉ. अशोक माईणकर (लेखक सासवड, ता. पुरंदर, जि.पुणे येथे स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत. या क्षेत्रात कामाचा त्यांना 35 वर्षाहून अधिक अनुभव आहे.) एक सत्य जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी..!👈👌👌👌👍👍👍 #कविता--आजची परिस्थिती #आजची परिस्थिती 🙏 #आजची खरी परिस्थिती #*आजची खरी परिस्थिती..!🥺✌️💯* #Life is not ones more. 🙏जीवन एक सत्य
ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
703 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
छोट्या छोट्या गोष्टी वरुन खूप मोठ भांडण होऊ शकत... किती चांगल नातं असेल एका कारणामुळे आपलं घर तुटत.... आपण आपल्या सासू -सासरे ना आई- वडील समजल तर आपला संसार सुखाचा होईल ...🙏 ✍️✍️✍️ *लग्न* नवीन नवीन छान राहायचे काही दिवसांनी... लग्न झालं नवीन नवीन खूप छान राहायचे.. दिवाळी आली, बायकोला पाच हजार रुपये दिले साडी घेण्यासाठी , आई वडिलांना पण दिले पैसे, बायकोला खूप राग आला कशाला तुझ्या आई वडिलाला का पैसे दिले, मला देईच ना , राहुदे त्यांना खर्चाया लागतो, माझ्यासाठी खूप कष्ट घेतले आहे मी आज आहे मी माझ्या आई वडीलच्या कष्टामुळे.. मला शिकून मोठ केलं हे सगळ पैसा 💸💰 आई- वडील कमवून ठेवलेलं आहे.. मी तर एक वर्ष झाल कामाला जात आहे, बायको मग लग्न कशाला केलं मग तुमच्या आई -वडिलांना सांभाळायची ना...अग तु माझी अर्धांगिनी आहेस मी जेवढं पैसा कमावतो, माझ्या, आई -वडीलाचां पण तेवढाच अधिकार आहे, तुझ पण तेवढाच अधिकार आहे, माझ्या आई- वडिलांमुळे मी आहे, मी आई वडिलांना कधी विसरू शकत नाही. बायको -:मग मला सोडता का आई वडीलांसाठी...? नवरा : नाही ग ,तुला कस सोडणार? माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर... नवरा जास्त बोलत नाही तो कामाला जातो,.... बायको :संध्याकाळी थोडा वेळ झोपली असते, मग सासूबाई,म्हणतात सुनबाई उठ ग, संध्याकाळ झाली आहे देवी *लक्ष्मी* येते असते असे झोपू नये..... रोज झोपत होती, सगळ स्वयंपाक सासूबाईच करत होती...... मुद्दाम स्वयंपाकाचे वेळी झोपली... नवरा येतो कामावरून बायकोला उठवतो काय झालं ग ?अस झोपलीस काय ?दुखतंय का सांग? लगेच जाऊ आपण दवाखाण्यात.. बायको काहीच बोलत नाही... सासुबाईचा स्वयंपाक होतो सगळ्यांना आवाज देत असते चला जेवण करायला.... सगळे येतात, बायको जेवण म्हटल्यावर पटकन उठते, सगळ्यांच जेवण होत, पुरुष मंडळी बाहेर अंगणात जातात.... , बायको जेवणाच ताट पण उचलत नाही, लगेच आपल्या रुममध्ये जाते.. सासूबाईनी सगळं आवरून घेतलं.... सासूबाई घरातील सगळं कामे करायची... मुलगा हे सगळं रोज पाहत होता, मुलगा आपल्या आईला रोज थोडी फार मदत करायचा...... आई तु किती काम करत असते? तुझ्या सूनेला ओरडून सांग जरा, नको बाळा ,ती पण माझ्या मुली सारखीच... परक्या घरातून आली आहे... आपण सांभाळून घ्यावे लागते.. मी केला म्हणजे मी मरत नाही मी माझ्या कुटुंबासाठीच करत असते.. सुमनबाई ला काही बोलू नकोस.......माझी लेक आहे ...😊 तो रागाने जातो आपल्या रूममध्ये ,बायकोला जाऊन बोलतो घरच तु काम करत जा माझी आई सगळ काम करत असते, बायको :तुम्हाला तुमच्या आईन कान भरल वाटते... नवरा: मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहे.. माझ्या आई ने खूप काम केलेले आहे... तु थोड काम केले तर आई ला तेवढेच आराम मिळेल.... हो मी करते माझ एक अट आहे? तुमचा सगळ पगार माझ्या हातात द्यायची...... तुला पण देतो ना खर्चाया........... बायको मग दे मला आता दहा हजार रुपये साडी घेण्यासाठी.... नवरा, माझ्याकडे एवड पैसे नाहीत तिन हजार रुपये आहे दोन हजार घे आता एक हजार मला लागतात, दहा हजार दिवाळी बोनस भेटलेवर देतो...... बायको ला वाटत सासू सासरे यांच्यावरच सगळा पैसा 💸💰 खर्च करतो हा.. बायकोला खूपच राग येतो, म्हातारे मुळं माझं संसार होणार नाही.. बायको आपल्या आई ला फोन केला तुझा जावय मला साडी साठी खूप कमी पैसे दिले आहे, मला खूप त्रास देतात सगळे मला नको राहायचं रडत बोलत असते, लगेच आईला वाटत आपली मुलगी खरं बोलत आहे. आई, विचार न करता बोलत असते, जावयाच लायकी नाही पैसै देईची, आई आपल्या लेकीच ऐकून खूप काही बोलत होती जावय बिच्चारा किती समजुन सांगत होता, सासू एक शब्द ऐकला तयार नव्हती.. बायको आपली छोट्या छोट्या कारणांवरून भांडणं करत होती.. नवऱ्यासोबत, भांडण करून आईला सांगायचे आई मला खूप त्रास देतात,सासू सासरे नवरा, आई समजून सांगण्याचा सोडून आपल्या मुलीच साथ देत असते , तु य सरळ माहेरी आपण बघू पुढे काय करायचे.... आईच ऐकुन मुलगी जाणार माहेरी.... नवऱ्याला वाटल काही दिवसांनी येईल परत, पण बायको दोन महिने माहेरीच होती, एक दिवस नवरा गेला बायको ला आणायला, जावय बिच्चारा अंगणात उभा होता, सासूबाई बाहेर आली कशाला आलात काय काम आहे, माझ्या बायकोला पाठवा सासुबाई मी घेऊन जायला आलो, सासूबाई नाही पाठवणार निघून जावा इथून माझी लेक मला जड नाही आम्ही सांभळ करू, जावय बोलतो ठीक आहे तुमच्या मुलीला शेवटच बोलतो तिला बाहेर पाठवा, बायको आली बाहेर, नवरा बोलतो तु येणार आहेस की नाही शेवटचं सांग, बायको, बोलते मी येणार पण माझी एक अट आहे, तुम्ही तुमच्या आई वडिलांना सोडून माझ्या माहेरी राहावे, आणि सगळा पगार माझ्या हातात, तरच तुमच्या सोबत राहायला तयार आहे, नवरा मी तुझ्या साठी मी माझ्या आई वडिलांना सोडणार नाही, माझ्या आई वडील माझ्यासाठी सर्व आहे मी सोडणार नाही, तुझ्या सारखी बायको नको, मी हेवड तुमचं ऐकून घेतो आहे माझ्या आई वडिलांच्या संस्कार मुळे तुला तेव्हाच सोडल असतं, मी खूप समजावून सांगितलं तुम्हाला आता नाही बस, बायकोला खूप राग येतो रागाने बोलते आपण, घटस्फोट घेऊ ,असं बोलून निघून जाते. तुझ्या आईने लेकीला पाठिंबा दिला म्हणून आपलं नवरा बायकोच नातं संपल ..तुला कळेल नात बदल खूप वेळ झाले असेल.... अजून वेळ गेली नाही विचार करून सांग... ती ऐकत नाही, नवरा निघून जातो आपल्या घरी...... सासरवाडीत काय झालं सांगत नाही, आई वडील उगाच टेन्शन घेतील म्हणून.... काही दिवसांनी घटस्फोट होतो दोघांच, बायको आपली माहेरी राहाते.... दोन तिन महिन्यांनंतर बायकोच्या भावाच लग्न होतं..... नवीन नवीन नणंद भावजय छान राहायचे, थोडे दिवासाने वहिनी ला कळल नणंदबाईच घटस्फोट झाले आहे... तरीही काही नाही बोलत तिला वाटत जाऊदे नणंदबाईच आयुष्य आहे.. नणंद, एक दिवस, एकदम दार न वाजवता रुममध्ये जाते, हे वहिनी ला आवडत नाही, वहिनी बोलून दाखवते,ताई तुम्हाला कळत नाही का आम्ही दोघं एकत्र असल्यावर असे येण चुकीचे आहे, दार वाजवून येत जावा, नणंदेला खूप वाईट वाटत, तिला आठवतं आपण पण नणंदेच किती वेळा अपमान केला आहे. दुसऱ्या दिवशी , वहिनी स्वयंपाक करत असते, नणंदेला आवाज देते ताई तुम्ही मदत करा, पाहुणे येणार आहेत, हो वहिनी करते मदत, तिला आठवतं नवऱ्याच्या घरी पोरणपोळी सासूबाई बनवत होते... मी सासू ला कधी मदत केली नव्हती.... आज वहिनी च्या माहेरच्या लोकांन साठी स्वयंपाक बनवत आहे.... वहिनी माहेरच्या आले थोडे वेळ गप्पा मारल्या नंतर जेवणं केलं वहिनी आई मी माझी आई गप्पा मारत बसलो, पुरुष मंडळी बाहेर अंगणात बसून गप्पा मारत बसले... आम्ही घरात वहीनी चे रूममध्ये बसून गप्पा मारत बसलो... थोडे वेळाने झोप येत होती म्हणून आई मी उठून गेले.. मी किचनमध्ये पाणी घेईला जात होते वहिनी ची आई सांगत होती, आपल्या लेकीला अग पोरी तुझ्या नवरा नवऱ्यासोबत नीट राहा काळजी घे सासू सासरे ना आई वडील समज तुझ्या नणंदेला बहिणसारख, तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घ्ये सासू थोडं वाईट बोलत असेल ऐकून घे तुझी आई बोलत आहे अस समज.... तु लहान होती तेव्हा मी तू चूक केली मारत होते ना, सासू ओरडत असेल तर वाईट मानु नको..... सासू सासरे दीर नणंद, तुझीच आहेत, आम्ही माहेरच्या लोक शेवट पर्यंत जाणार नाही.... तुझ्याच सासरच्या लोक शेवट पर्यंत जाणार आहेत. नवऱ्याच्या नातेवाईक कोणी असो अपमान करू नकोस..... दुसऱ्यांच ऐकून आपलं संसार उद्धवस्त करून घेईच नाही...... वहिनीच्या आई बोल ऐकून.. आपल्या रूममध्ये विचार करत बसली खरंच मी काय केलं माझ घर मीच तोडल... वहिनीची आई किती चांगली आहे.. माझी आई माझ संसार उद्धवस्त केलं रडत होती, आई गेली माझी लेक का रडत आहे.... अग पोरी का रडतेस कोण काय बोल का.. बघतेय मी सांग तरी..लेक रडत रडत आई माझ संसार का उद्ध्वस्त केल ग तू वहिनी च्या आई सारख समजून सांगितल असत मी सासरी असते... मला तू माहेरी का घेऊन आलीस...... आता मला कळल वेळ निघून गेला आता. माझा नवरा दुसर लग्न केला. माझ्या नवऱ्याला दुसरी बायको चांगली भेटली आहे ते खूप सुखी आहेत... मी घटस्फोट घेऊन खूप मोठी चूक केली आहे...... परत तर मी कस जाऊ.... मी कोठे जाऊ सांग ऐक पोरी तु माहेरी आहेस तुला कोण आहे तुझ सांभाळ करण्यासाठी आम्ही किती दिवस तुझ्या सोबत राहणार.. म्हणून सांगत आहे भाऊ वहिनी, त्याचं ऐकत जा.. आम्ही आई वडील किती दिवस तुझ्या सोबत असू एक दिवस मरणार आम्ही...... आयुष्याभूर नसणार तुझ्या सोबत.. आई हे मला माझ्या लग्नानंतर मला असे सांगितले असते.. मी आज सासरी असल्या असते, माझा नवरा खूप चांगला होता, सासूबाई आईपेक्षा किती जीव लावायची. तुझ ऐकून माझ संसार उद्धवस्त करून घेताला.... तु मला समजून सांगितले असते आज माझ घटस्फोट झाला नसता. माझा नवरा किती समजुन सांगत होता मी ऐकले नाही... तुझ्या मुळे माझा संसार उद्धवस्त झाला........... जिथं एका आईच्या चुकीच्या पाठींब्यामुळे स्वतःची मुलगी सासरहुन कायमची माहेरी आली.मुलींना आईने किती पाठीशी घालावं किंवा मुलीच्या संसारात आईने का म्हणून हस्तक्षेप करावा? इतकाच लेकिचा पुळका होता,प्रेम होतं तर *एखादा घरजावयी शोधायचा सासुच्या तालावर नाचणारा.* २७/२८ वर्षांपूर्वी ज्या मुलींची लग्न झाली ज्यांना कधी तोंड उघडायची मुभा नव्हती आज तीच मुलीच्या संसारात नाक तोंड खुपसते.आईचं मुलीच्या संसाराची राख करताना दिसत आहे.अशा बायकांनी स्वतःचा भुतकाळ आठवावा. आपल्यावेळी काय,कसे दिवस होते जिथं सासु सासरे दिर नणंद यांच्यासमोर बोलायची हिम्मत होत नव्हती आणि आज काळ बदलला म्हणून स्वतःच्याच मुलीच्या संसाराचे वाटोळे करायला निघाली.खरंतर हल्लीच्या मुलींनासुद्धा सासरची प्रत्येक गोष्ट माहेरी सांगायची सवयच लागली.ज्या मुलीला स्वतःचा संसार कळला ती मुलगी कधीच सासरचे कुठलेच विषय माहेरपर्यंत नेत नाही.आईचं सुद्धा कर्तव्य आहे मुलीला समजाऊन सांगणं.नाही की तीच्या संसारात दखल देणं. *मुलीपेक्षा आईच बोलायला वरचढ असेल तर कशाला लेक सासरी राहिल?* *मुलगी सासर सोडुन माहेरी रहाण्यात कसला मोठेपणा वाटतो?* सासरी नांदणारी मुलगी आईबापाला सगळ्यात मोठा आनंद देते. *हल्ली मुलगी एकपट तर आई दुप्पट असंच काहिस चित्र दिसतंय.* आज सासर सोडुन माहेरी आलेल्या मुलीचं भलेही ऊद्या दुसरं लग्न लावून द्याल पण लक्षात ठेवा तुम्हाला आयुष्यभर पश्चात्तापच होणार... कारण पहिला नवरा तो पहिलाच असतो.आज तीन हजाराची साडी घेणारा ऊद्या तुला हौसेने दहा हजाराची साडी न मागता घेईल. "तु फक्त संयम ठेव "हेच जर, तू दुसरं लग्न केलं तर तुला आयुष्यभर ऍडजस्ट " करुनच रहावं लागेल. *भांडणं कीतीही करा पण त्याचा आवाज घराबाहेर जायला नको.* *शाब्दिक चकमकीचं युद्ध माहेरच्या रणांगणात मुळीच नेऊ नको * सासरची गाऱ्हाणी माहेरच्या ऊंबऱ्यात नेऊ नको. संसार करताना कीतीही भांडणं होऊ द्या,पण ती फक्त दोघातच ठेवा.गोडीत असताना अशा विषयांवर बोलत चला. गोडीगोडीत एकमेकांच काय चुकलं ते बघा. कारण भांडणात फक्त एकमेकांच्या चुकाच दाखवल्या जातात.म्हणूनच वाद विकोपाला जातात.ह्याच गोष्टी गोडीत मिटवून घेता येतात. दोघांमधील बाद विकोपाला जात असतील तर दोघांपैकी किमान एकाने तरी स्वतःवर संयम ठेवला पाहिजे.समजून घेतलं पाहिजे.तरच संसार सुखाचा होईल.हे स्वानुभवाचे बोल आहेत. जर मुलींनी छोट्या छोट्या गोष्टी माहेरी सांगितल्या नाहीत तर बरेचसे घटस्फोट वाचतील... बरेचसे संसार वाचतील.... *एक आम्ही होतो गळ्यातले काळे मणी आणि दोन फुटक्या मंगळसूत्राच्या वाट्यावर संसाराचं आभाळभर आनंद ऊपभोगणारे.* *कपाळावरच्या कुंकवाला बघुन नवऱ्याला दीर्घायुष्य लाभाव म्हणून देवाला हात जोडणारा आमचा काळ होता.* दोन वेळेचं पोटाला पोटभर मिळालं तरी आम्हाला समाधान असायचं. आणि आता.... बंगला,गाडी गडगंज मालमत्ता असुनही सुखी,समाधानी नाही. हल्लीच्या मुली... यांच्या अपेक्षाच संपत नाही... परिणाम... *घटस्फोट*... मुलीच्या आईंनो तुम्हाला विचारावं वाटतं... तुमच्या संसारात तुमच्या पण आई-वडिलांनी अशी कधी लुडबुड केली का? मुळीच नाही. पुर्वी ईतका छळ, मारहाण व्हायची तरी सुद्धा आईवडील समंजसपणे चार पाहुणे-रावळे गोळा करून वाद मिटवत असे. कारण मुलगी माहेरी घेऊन येणं हे त्यांच्या बुद्धिला कधी पटलंच नाही. वाद झाल्यानंतर माहेरी आलेल्या मुलीला दोन दिवसांत सासरी नेऊन सोडायचे. राग येईल पण आजची स्त्री बदनाम होत चालली.सासु-सासऱ्यांना मारहाण,नवऱ्याला छळणाऱ्या,त्याला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या , क्षणाक्षणाला कायद्याचा धाक दाखवणाऱ्या मुलींना,बायकांना खरंच धाक राहिलाच नाही.... काही चुकीचे वाटले असल्यास माफी असावी....🙏🥺 अस मी म्हणणार नाही कारण हेच कल युगातील सत्य आहे..... #आजची परिस्थिती #*आजची खरी परिस्थिती..!🥺✌️💯* #आजची खरी परिस्थिती #आजची परिस्थिती 🙏 #कविता--आजची परिस्थिती
ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
1.1K जणांनी पाहिले
8 दिवसांपूर्वी
!! शुभ रात्रीं !! बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतीम यंत्र...! सकाळच्या गजराबरोबर सेवेस हजर, पेस्ट आणि ब्रश दिसेल, पहिले जिथे जाईल नजर, गरम पाणी, श्यांपु, टॉवेल, साबण, असेल सुसज्ज बाथरुम, अंगातल्या कपड्याबरोबर चहा असेल हजर, असंच असतं रोज सकाळचं सत्र..! बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतीम यंत्र...! ऑफीसला जातांना गरमागरम डबा, आणि गोड मुका, संध्याकाळी परत स्वागत, घालून पोटात दिवसभरच्या चुका, हातातली बॅग टेबलावर जाते, संध्याकाळच्या चहा बरोबर, 'अहो ऐकले का' म्हणून ऐकू येतात गोड गोड हाका, तिच जाणो तिचे हे अजब तंत्र..! बायको म्हणजे देवाने घडलेले अप्रतीम यंत्र...!‌ रुचकर जेवणा बरोबर गप्पांची फोडणी असते, डोळा लागे पर्यंत भांड्याशी तीचे युद्ध सुरुच असते, सगळ्या घरावर शेवटचा हात मारुन, पदराला हात पुसत गालात खुदकन हसते,आणि कानात पुटपुटते प्रेमाचा मंत्र..! बायको म्हणजे देवाने घडलेले अप्रतीम यंत्र.. जेवले का हो.. म्हणून आठवण करून देणारे, मनातल्या भावना लगेच जाणून घेणारे, जीवनाच्या वाटेवर ऊन असो वा सावली, नेहमीच सोबत देणारे, आधार होणारे, असे आहे बायको नावाचे यंत्र...! तेव्हा आदर करा बायकोचा..! पण फक्त स्वत:च्या............😀😎😋🍫🌿 #बायको #बायको #पत्नी #🙏 जागतीक पत्नी कौतुक सोहळा दिवस #पती पत्नी
See other profiles for amazing content