फॉलो करा
चला हवा येऊ द्या
@chawayeudya
75
पोस्ट
37,476
फॉलोअर्स
चला हवा येऊ द्या
915 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
गोविंद हा प्रयागबाईंची लेक नर्मदा कल्याण फोके यांचा एकुलता एक मुलगा. तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बहिणीने यापूर्वी अनेकदा पंढरपूरची वारी केली आहे. मीही यंदा वारीत जाईन, असा हट्ट गोविंदने केला होता. फोके परिवारातील सर्वजण शेती करतात. 18 जूनपासून श्री देवराबुवा हादगावकर दिंडी क्रमांक 12 (संत तुकाराम महाराज पालखी रथामागे) तो सहभागी झालेला होता. एकविशीचा गोविंद अतिशय उत्साही होता. गोविंद व आजी दोघे संत तुकाराम महाराज पालखीत सहभागी झाले. तो रोजच्या भजन-कीर्तनात उत्साहाने सहभाग घ्यायचा. रात्री उशिरापर्यंत सर्वांसमोर नाचायचा. अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या बोऱ्यात सापडून त्याचा करुण अंत झाला. त्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नातवाकडे पाहून त्याच्या आजीने एकच टाहो फोडला. टाहो फोडणाऱ्या आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय थांबले. त्यांचेही डोळे पाणावले. गोविंद हा पहिल्यांदाच वारीत सहभागी झाला होता. गोविंदची ही वारी पहिली आणि शेवटची ठरली. #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑
See other profiles for amazing content