फॉलो करा
Harsshad Boratay
@harsshad
299
पोस्ट
415
फॉलोअर्स
Harsshad Boratay
839 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#🎉नाताळच्या शुभेच्छा🎁 नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा महत्वाचा सण. प्रभू येशु ख्रिस्तांचा जन्मदिन म्हणून सर्वजण हा दिवस साजरा करतात. प्रेम, शांती व मानवतेचा संदेश देणाऱ्या या सणाच्या समस्त ख्रिस्ती बांधवाना हार्दिक शुभेच्छा!
Harsshad Boratay
834 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#🎭Whatsapp status संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) च्या अध्यक्षा, कॉंग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, राज्यसभा खासदार श्रीमती सोनिया जी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! २००४ ते २०१४ युपीए सरकारच्या काळात सर्वसामान्य भारतीयांच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने घेतल्या गेलेल्या अनेक निर्णयांमध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते. माहितीचा अधिकार, अन्नसुरक्षा कायदा आणि मनरेगा यांसारख्या देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरलेल्या अनेक योजना त्यांच्या नेतृत्वात पूर्णत्वास आल्या. #सोनियागांधी #Soniya_Gandhi #Birthday
Harsshad Boratay
1.2K जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#🌸डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा..!” हा मंत्र समाजाला देऊन मनामनात स्वाभिमानाची ज्योत पेटविणारे तत्वज्ञ, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजाविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारणारे समाजसुधारक, ज्या काळात महिला व कामगारांना तुच्छतेची वागणूक दिली जायची तेव्हा त्यांच्या हक्कांसाठी लढणारे नेते, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Harsshad Boratay
2.1K जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#🙏श्री दत्त जयंती🌷 धावत येसी भक्तांसाठी,ब्रह्मा विष्णू ,महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा! श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
See other profiles for amazing content