फॉलो करा
Mandar
@mandar167
1,046
पोस्ट
7,683
फॉलोअर्स
Mandar
544 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
🤔 ८वीच्या विद्यार्थ्याला "चोर" या विषयावर निबंध लिहायला सांगितले होते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण त्याने लिहिलेला निबंध असा होता... *"चोर"* चोर हे देखील देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते रोजगारनिर्मिती आणि देशाच्या विकासात आपले मोठे योगदान देतात. सेफ, कुलुपे, लॉकर, कपाटे इत्यादी वस्तू फक्त चोरांमुळेच तयार केल्या जातात. या वस्तू बनवणाऱ्या अनेक कारखान्यांना आणि कामगारांना चोरांमुळे रोजगार मिळतो. घरांमध्ये कुलपे, ग्रील्स, दरवाजे आणि खिडक्यांवर लॅच बसवण्यासाठी मिस्त्री आणि कामगारांना काम मिळते. घर, दुकान, शाळा, कॉलेज, ऑफिस आणि कारखाने चोरांपासून वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि वॉचमन आवश्यक असतात. CCTV कॅमेरे, मेटल डिटेक्टर, सुरक्षा यंत्रणा बनवणाऱ्या कंपन्यांना देखील रोजगार मिळतो. चोरांमुळे पोलीस अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, न्यायाधीश, वकील यांनाही काम मिळते. पोलीस दलासाठी लागणारी बॅरिकेड्स, शस्त्रे, गोळ्या, दंडुके, गणवेश, वाहने इत्यादी खरेदीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. चोरांमुळे तुरुंग, जेलर आणि तुरुंगातील कर्मचारी यांनाही रोजगार मिळतो. मोबाईल, लॅपटॉप, कार, मोटरसायकल, घरगुती वस्तू, पर्स किंवा लिपस्टिक चोरी गेल्यानंतर लोकांना त्या पुन्हा खरेदी कराव्या लागतात — त्यामुळे व्यापार वाढतो. आणि प्रसिद्ध तसेच नामांकित चोर राजकारणात प्रवेश करून आणखी मोठ्या चोरीला हात घालतात. एकूणच पाहता, देशाच्या अर्थव्यवस्थेत चोरांचे योगदानही कमी नाही! 😄 *शिक्षकांनी या “संशोधनसमृद्ध” निबंधाला १००% गुण देऊन त्या विद्यार्थ्याला मेरिट लिस्टमध्ये स्थान दिले.* दृष्टिकोन महत्त्वाचा असतो! 😅🙏🏼😉😎🤣एकदा नक्की वाचा! #🤘टाईमपास😝 #👌प्रेरणादायी स्टेट्स #💭माझे विचार #🙋‍♂️Thank You🙂 #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार
Mandar
577 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
#😎आपला स्टेट्स #💔प्रेम की यातना #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #🤗 जुन्या आठवणी #🤗 जुन्या आठवणी #🙂Positive Thought .......✍️ ︵︷︵︷︵︷︵︷︵​︷ *काही राहून तर नाही ना गेलं* ︶︸︶︸︶︸︶︸︶︸ तीन महीन्याच्या बाळाला दाई पाशी ठेवून कामावर जाणाऱ्या आईला दाईनं विचारलं ~ काही राहून तर नाही ना गेलं ! ❓ पर्स, किल्ल्या सगळं घेतलंत ना ? आता ती कशी हो, हो म्हणेल ? पैशापाठी पळता-पळता सगळं काही मिळविण्याच्या महत्वाकांक्षेपोटी ती जिच्यासाठी एवढा आटापिटा करतेय तीच तर राहून गेलीय ! 😑 लग्नात नवऱ्या मुलीस सासरी पाठवताना लग्नाचा हाॅल रिकामा करून देताना मुलीच्या आत्यानं विचारलं ~ दादा, काही राहून तर नाही गेलं ना ? चेक कर जरा नीट..! बाप चेक करायला गेला, तर वधूच्या खोलीत काही फुलं सुकून पडलेली दिसली. सगळंच तर मागं राहून गेलंय. २१ वर्षे जे नाव घेऊन आपण जिला लाडानं हाक मारत होतो, ते नाव तिथंच सुटून गेलंय, आणि त्या नावापुढे आतापर्यंत अभिमानानं जे नाव लागत होतं, ते नावही आता तिथंच राहून गेलंय. दादा, बघितलंस ? काही मागे राहून तर नाही ना गेलं ? बहिणीच्या या प्रश्नावर भरून आलेले डोळे लपवत बाप कांही बोलला तर नाही, पण त्याच्या मनात विचार आला~ सगळं काही तर इथंच राहून गेलंय .! 😔 मोठी मनिषा मनी बाळगून मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं, आणि तो शिकून तिथंच सेटल झाला. नातवाच्या जन्मावेळी मोठ्या मुश्किलीनं तीन महिन्यांचा व्हिसा मिळाला होता, आणि निघतेवेळी मुलानं विचारलं ~ बाबा सगळं काही चेक केलंय ना ? काही राहून तर नाही ना गेलं ? काय सांगू त्याला, की आता.. आता राहून जाण्यासारखं माझ्यापाशी उरलं तरी काय आहे ..! 😔 सेवानिवृत्तीचे दिवशी पी. ए. नं आठवण करून दिली ~ चेक करून घ्या सर ..! काही राहून तर नाही ना गेलं ? थोडं थांबलो, आणि मनात विचार आला, सगळं जीवन तर इथंच येण्या-जाण्यात निघून गेलं. आता आणखी काय राहून गेलं असणार आहे? 😔 स्मशानातून परतताना मुलानं ... मान वळवली पुन्हा एकदा, चितेकडे पाहण्यासाठी ... पित्याच्या चितेच्या भडकत्या आगीकडे पाहून त्याचं मन भरून आलं. धावतच तो गेला पित्याच्या चेहऱ्याची एक झलक पाहण्याचा असफल प्रयत्न केला.... आणि तो परतला. मित्रानं विचारलं ~ काही राहून गेलं होतं कां रे ? भरल्या डोळ्यांनी तो बोलला ~ नाही , काहीच नाही राहिलं आता. आणि जे काही राहून गेलंय, ते नेहमीच माझ्या सोबत राहिल .! 😌 एकदा... थोडा वेळ काढून वाचा, कदाचित ... जुना काळ आठवेल, डोळे भरून येतील, आणि आज मन भरून जगण्याचं !!.. कारण मिळेल ..!! *मित्रांनो ! कुणास ठाऊक ?* केव्हा या जीवनाची संध्याकाळ होईल. असं काही होण्याआधी सर्वांना जवळ घ्या, त्यांच्या पाठीवर हात फिरवा. त्यांच्याशी प्रेमानं बोलून घ्या जेणे करुन काही राहून जाऊ नये ..!!! *..........✍️ 🖊️🖊️ 🌹🙏💐🌹
See other profiles for amazing content