🎯 नेटवर्क मार्केटिंग स्कॅम कसा होतो | Network Marketing Scam Explained in Marathi
आजकाल सोशल मीडियावर आणि ऑनलाईन जगात "नेटवर्क मार्केटिंग", "MLM", किंवा "Direct Selling Business" या नावाखाली हजारो लोकांना फसवले जात आहे.
सुरुवातीला हे लोक आपल्याला सांगतात की –
“फक्त थोडे पैसे गुंतवा आणि काही लोकांना जोडा... मग तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता!”
पण खरी गोष्ट अशी असते की —
हा सगळा खेळ पिरॅमिड स्कीम वर चालतो.
वरचा माणूस खाली लोकांना जोडतो, ते आणखी लोकांना जोडतात, आणि पैसे सतत वर जातात.
शेवटी जेव्हा नवीन लोक मिळणं थांबतं, तेव्हा संपूर्ण सिस्टम कोसळते... आणि फसतात ते शेवटी आलेले लोक!
ही कंपन्या मोठ्या स्वप्नांच्या आणि लाईफस्टाईलच्या जाहिराती करून तरुणांना आकर्षित करतात –
महागड्या गाड्या, परदेशातले ट्रिप्स, “Financial Freedom” अशी मोठी मोठी स्वप्नं दाखवतात.
पण सत्य हे आहे की ९०% पेक्षा जास्त लोक या स्कीममध्ये पैसे गमावतात.
👉 लक्षात ठेवा:
जर एखाद्या कंपनीत उत्पन्न मुख्यतः “लोकांना जोडण्यावर” अवलंबून असेल आणि उत्पादन फक्त नावापुरतं असेल, तर तो व्यवसाय नाही... तो स्कॅम आहे!
.
#🙂Positive Thought