फॉलो करा
संदिप खुरुद
@sandipkhurud
938
पोस्ट
4,455
फॉलोअर्स
संदिप खुरुद
810 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
*मुलगा व वडील* *(लघुकथा)*         विकी लहान होता त्यावेळी त्याला त्याचे मित्र, शिक्षक विचारायचे. "तुझे वडील काय करतात?" त्यावेळी त्याला खूप वाईट वाटायचे.कारण त्याचे वडील कामगार होते. त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल सांगण्यास त्याला लाज वाटायची.             विकी आज 27 वर्षांचा झाला आहे. आता त्याचे वडील थकले आहेत. तरीही ते काम करुन घर खर्च भागवतात. विकी आता काहीच काम करत नाही.             आता लोक त्याच्या वडिलांना विचारतात. तुमचा मुलगा काय काम करतो?             वडिलांना वाईट वाटतं. त्यांना उत्तर सुचत नाही. त्यांना आपल्या मुलाची लाज वाटत नाही. पण त्याच्या भविष्याची चिंता वाटते. त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी ते लोकांना सांगतात. तो आणखी शिकत आहे. *लेखक- संदीप खुरुद*     #🙂Positive Thought #😎आपला स्टेट्स #वडील #माझे आई वडील #वडील
See other profiles for amazing content