फॉलो करें
Shamshuddin Naikwade
@shamshuddin786
476
पोस्ट
1,891
फॉलोअर्स
Shamshuddin Naikwade
631 ने देखा
1 महीने पहले
इन्ना लिल्लाही व इन्ना इलाही राजीऊन इस्लाम धर्मातील एक महान आध्यात्मिक मार्गदर्शक, सूफी पिर हज़रत #ज़ुल्फेकार_अहमद_नक्शबंदी साहेब यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. त्यांच्या जाण्याने इस्लामिक आणि सूफी जगताने एक प्रकाशमान मार्गदर्शक गमावला आहे. आत्मशुद्धी, सुन्नतेचे पालन, तज़किया-ए-नफ्स आणि मानवतेची सेवा हा त्यांच्या संपूर्ण जीवनाचा केंद्रबिंदू होता. त्यांच्या विचारांचा नूर, त्यांच्या दुआंचा असर आणि त्यांनी दाखवलेला सत्याचा व अध्यात्माचा मार्ग सदैव त्यांच्या शिष्यांच्या आणि अनुयायांच्या हृदयात जिवंत राहील. अल्लाह तआला त्यांच्या आत्म्यास मगफिरत अता करो, त्यांचा दर्जा जन्नतुल फिरदौसमध्ये उंच करो,आणि त्यांच्या कुटुंबीयांना, शिष्यांना व अनुयायांना हा दुःखाचा प्रसंग सहन करण्यासाठी सब्र प्रदान करो. आमीन नक्शबंदी सिलसिल्याचा एक तेजस्वी दीप आज डोळ्याआड झाला, पण त्याचा प्रकाश कधीही विझणारा नाही. #intkal
See other profiles for amazing content