फॉलो करा
विजया चिंचोळी
@vnc50
3,738
पोस्ट
6,487
फॉलोअर्स
विजया चिंचोळी
1.1K जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
श्रावण साजिरा आला श्रावण साजिरा धरा भिजली धारात शालू नेसून हिरवा जणू हसते गालात रिमझिम पावसात झाडे वेली बहरती चारा हिरवा खाऊन पशु पक्षी आनंदती ढगामागे लपूनिया सूर्य कौतुके पाहतो शांत सोनेरी किरणे मधूनच उधळतो उंच डोंगरावरून धबधबे कोसळती दृश्य दिसे मनोहर नेत्र पारणे फिटती सजे सृष्टीचा सोहळा मन जाई आनंदून भिजू श्रावणसरीत सण साजरे करून नागोबाला पुजूनिया फेर धरून नाचूया अर्पू नारळ सागरा राखी भावाला बांधूया कृष्ण जन्माचा सोहळा करू खुशीत साजरा आनंदाची उधळण करी श्रावण हासरा सौ. विजया चिंचोळी खारघर, नवी मुंबई #✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #श्रावण नारळी पौर्णिमा #श्रावण महिन्यात #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
See other profiles for amazing content