Maharashtra Political Crisis सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यानंतर भगतसिंह कोश्यारींचा माध्यमांनाच खोचक प्रश्न म्हणाले
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर निरीक्षणे नोंदवली आहेत यात माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले आहेत मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर मी त्यांना तुम्ही राजीनामा देऊ नका असे सांगू का, असा खोचक सवाल भगतसिंह कोश्यारी यांनी माध्यम प्रतिनिधींना केला