#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१३ जानेवारी इ.स.१६७२* *( पौष वद्य नवमी शके १५९३ संवत्सर विरोधकृत शनिवार )* *दिलेर खानाने पुणे लुटले :-* *पेशवे मोरोपंतांनी दिलेर खानाचा वेढा उठवण्यासाठी १२ हजार मावळे पाठवले. त्यात एक हजारी अधिकारी रामाजी काका पांगेरा होते. मावळ्यांनी गनिमी कावा वापरून खानाला हैराण करून सोडले इतके की खानाने वेढा उठवला. मराठ्यांनी दिलेर खानाचा पाठलाग केला आणि कणेरगड परिसरात खानाची आणि पांगेरा काकांची गाठभेट झाली. काकांनी मावळ्यांना आव्हान केले की, ' आता अखेरचा एल्गार... आपण सोबती असतील ते उभे राहावे ' ७०० मावळे रामाजी काकांबरोबर उभे राहिले. खानाची फौज प्रचंड होती विरुद्ध ७०० मावळे. मराठे घेरले गेले, पण मावळ्यांनी जो प्रतिकार केला तो सुन्न करणारा होता. लाह्या फुटाव्यात अशी मोगलांची सर्रास कत्तल, लांडगेतोड केली. एकेक मावळ्यांच्या शरीरावर तीस चाळीस जखमा, मात्र जखमांची पर्वा न करता मराठे अंगात सैतान शिरल्याप्रमाणे झुंजत होते. पहिल्या प्रहरातच बाराशे हशम, बोकड कपावेत अशा प्रकारे कापून काढले. दिलेर खानाला आठवला तो पुरंदर आणि मुरारबाजी काकांचा पराक्रम! टिकाव लागेल की नाही हे लक्षात येताच खानाने राखीव फौज उतरवून हल्ला केला. आणि अखेर ह्या रणसंग्रामात ७०० मावळे आणि रामाजी काका पांगेरा धारातीर्थी पडले. कोरजाई गावचा सुपुत्र कणेरगड परिसरात धारातीर्थी पडला. रणसंग्रामात झालेली नामुष्की पाहून ह्याचा सूड म्हणून दिलेर खानाने पुणे लुटून निरपराध नागरिकांची हत्या केली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ जानेवारी इ.स.१६८०* *(पौष वद्य ७ सप्तमी शके १६०१ संवत्सर सिद्दार्थी वार मंगळवार)* *छत्रपती शिवाजी महाराज व युवराज शंभुराजे यांची पन्हाळा#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
00:29
