ShareChat
click to see wallet page
🌟 गडचिरोलीची लेक, जागतिक व्यासपीठावर झळकली! दुबई येथे पार पडलेल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी श्वेता कोवे या दिव्यांग तरुणीने ‘पॅरा आर्चरी’ स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदकांची कमाई करत जागतिक स्तरावर गडचिरोली जिल्ह्याच्या नावाचा झेंडा अभिमानाने फडकावला आहे. या उल्लेखनीय यशासाठी तिचे मनःपूर्वक अभिनंदन. श्वेताच्या वडिलांच्या निधनानंतर आईने मोलमजुरी करत कुटुंब सांभाळण्याबरोबरच श्वेताला सातत्याने प्रेरणा देत तिच्या स्वप्नांना बळ दिले. जीवनातील संघर्षांवर मात करत श्वेताने जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश मिळवले आहे. या स्पर्धेत तब्बल 14 देशांच्या खेळाडूंशी सामना करत श्वेताने हा विजय संपादन केला असून भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न ती उराशी बाळगून आहे. देशासाठी काहीतरी मोठे करून दाखवण्याची क्षमता तिच्यात नक्कीच आहे, याची साक्ष तिची ही कामगिरी देते. श्वेताचे यश दुर्गम भागातील असंख्य मुला-मुलींसाठी आशा, प्रेरणा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक ठरत आहे. #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र - 0 ~ 3O 10 Rise 9494 N> 0 ~ 3O 10 Rise 9494 N> - ShareChat

More like this