ShareChat
click to see wallet page
फुंकर फुंकर हळूवार शब्दच सुंदर उच्चारता येई स्मित ओठावर कान्हा घालतो फुंकर अधरीच्या पाव्यावर सूर अद्भूत मधुर यमुनेच्या तीरावर बाळ सानुले धडपडे माय घालता फुंकर कुशिमध्ये शिरे वात्सल्य पदर जाता कण नयनी मारा हळूच फुंकर चुलीमध्ये धूर होता फुंकता पेटे फरफर दुःख होता अनिवार सांगावे प्रियजना शब्द फुंकर प्रेमळ उभारी मिळे मना फुंकर घालता हळूवार प्रियेच्या बटेवर तार छेडता मनीची प्रीत झंकार अलवर सौ. विजया चिंचोळी खारघर, नवी मुंबई #📝कविता / शायरी/ चारोळी #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #✍मराठी साहित्य #कविता #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝

More like this