ShareChat
click to see wallet page
#📝कविता / शायरी/ चारोळी #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #✍मराठी साहित्य दिनांक :- २१/०४/२०२१ शीर्षक: प्रभू रामचंद्र ( मधुसिंधू काव्य ) सावळा राम विष्णू अवतार दुष्टांचा संहार प्रभू श्रीराम एकवचनी मातृपितृ भक्त वचनाशी सक्त फिरला वनी भरत येई विनविले अती चलावे परती पादुका देई वनवासात सीतेची सोबत लक्ष्मण संगत चौदा वर्षात हनुमंताची रामभक्ती थोर शबरीची बोरं कृपा रामाची सीताहरण वानर सोबत सेतुला बांधत लंका दहन युद्ध करून मारुनी रावणा राज्य बिभिषणा न्याय करून सीता घेऊन आले परतून वनवासातून आनंदी धून रामराज्यात आनंद बहार सर्वांना आधार प्रजा सुखात बोल ऐकून सीतेला धाडीले वनात सोडीले मन मारून लव नि कुश रामायण गाती ओळखली नाती श्रीराम खुश अग्निपरीक्षा देई सीतामाय धरणीत जाय सत्वपरीक्षा पूर्वसंचित मानवाचे भोग पत्नीचा वियोग सुख वंचित वंदू चरण श्री रामरायाला तारण्या जगाला दुःख हरण सौ. विजया चिंचोळी खारघर, नवी मुंबई

More like this