*नवऱ्याने बायको सोबत कसे वागावे ?* नवऱ्याने बायकोचेही, दुःख समजून घ्यावे... रविवारी तरी बिचारीला, जास्त झोपू द्यावे... काय हरकत आहे तिला, चहा करून द्यायला. विसरू नये जास्त दुध, आणि अद्रक घालायला. विनाकारण खुसपट काढून, आदळ-आपट करू नये... बागलेतले काढून उगी, बाजारात मांडू नये... सकाळ संध्याकाळ ती, किचन मध्येच असते. सांगा बर किती वेळ, तक्क्याला टेकून बसते ? म्हणून तिला रविवारी, सुट्टी दिली पाहिजे... हॉटेल मध्ये जेवणाची, ऑफर दिली पाहिजे... माणूस म्हणून तिच्याकडे, थोडं तरी बघा... मोलकरीण नाही पत्नी आहे, ती आनंदाने जगा... असू द्या तुझ्या डायरीत, तिच्या कष्टांची नोंद... कधीतरी तिचं नांव, तुझ्या हातावर गोंद... म्हणून तरी पहा तिला, चल सिनेमाला जाऊ... येता येता हॉटेल मध्येच, तुझ्या आवडीचं खाऊ... ती कुठे म्हणत असते, युरोप टूरला जाऊ... गोडी गोडीत म्हणा यंदा, माथेरानच पाहू... येताजाता घालून पाडून, बोलणं तुम्हाला शोभतं का ? बघा थोडं बायकोचा, मित्र होता येतं का ? छोट्या छोट्या demand असतात, पूर्ण करायला शिका... नेहमी नेहमी काढू नये, फक्त तिच्याच चुका... मोकळे पणाने बोलायला, पैसे थोडेच लागतात... काही काही नवरे बायकोशी, विचित्रपणेच वागतात... ती समोर दिसली की, वेडं-वाकडं तोंड करतात.. स्पष्ट ऐकू येत नाही, पण काहीतरी बोलतात... खवचटपणा सोडून देऊन, जरा नीट वागा... गुलुगुलु कसे बोलतात, थोडं शेजारी पण बघा... बायको म्हणजे लफडं थोडंच, झालं काय लाजायला ? कुठे कुणाची हरकत आहे, हातात हात घेऊन बोलायला ? सुकलेली दिसतेस आज, तुझं काही दुखतंय का ? खरं सांग माझ्या वागण्यात, कुठे काही चुकतंय का ? मनांत काही ठेऊ नकोस, मोकळेपणाने बोल... तुझ्या भावना माझ्यासाठी, आहेत खूप अनमोल... तिचे काही चुकले तर, एकांतात सांगावे... पोरं सोरं सुनां समोर, आदरानेच बोलावे... दोघांनीही मान्य कराव्यात, आपल्या आपल्या चुका... भांडण करायला काय लागतं, Sorry म्हणायल शिका... #👫नवरा बायको / सासू सून
587.5k जणांनी पाहिले
7 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post