ShareChat
click to see wallet page
## ग्रहांच्या अंगठीचा आकार कसा असावा ? # स्व लिखित # संदर्भ :बृहत्संहिता,रसरत्नसमुच्चय,रत्न विज्ञान # लेखक : ज्यो.दिलीप जुगादे (Astro Shukra) माझ्या मागील काही रत्नविषयक लेखांमध्ये रत्नशास्त्राचे नियम,आयुष्य,धातू ,गुणविशेष,रत्न लाभदायक आहे कि नाही कसे बघायचे या विषयी माहिती बघितली. कुंडलीतील राशी व ग्रहांची तत्वे यांची पडताळणी करूनच रत्ने विशिष्ट धातूमध्ये अंगठीत धारण करायची असतात. आपण बघतो कि अंगठीचा आकार सोनार आपल्या कौशल्याने,कलाकुसरीने अथवा घालणाऱ्याच्या आवडी-निवडी नुसार करीत असतो. ग्रहांच्या अंगठीचा आकार कसा असावा ? तर ग्रहांची अंगठी त्याच्या चिन्हांकित आकारात जर बनवली तर ग्रह जास्त मुदित होतील व धारण करणाऱ्याला त्याचा लवकर व चांगला फायदा होईल. खाली अंगठ्याचे प्रकार या शीर्षक अंतर्गत अंगठ्यांच्या आकृती दिलेल्या आहेत. प्रथम रवीची अंगठी त्यात रवीचे बारा दाते दाखविले आहेत.त्याप्रमाणे करून त्यामध्ये माणिक रत्न गोल असे बसवावे व ते खालून उघडे असावे.बोटाला रत्नाचा स्पर्श झालेला असावा. चंद्राच्या अंगठीच्या दोन आकृती दिलेल्या आहेत.त्यापैकी एक स्वीकारून त्यामध्ये बिनछिद्राचा खरा मोती बसवावा.खालून तो उघडा असावा. मंगळाची त्रिकोणी पोवळ्याची अंगठी आकृतीत दाखविल्याप्रमाणे बनवावी अर्थातच रत्न खालून उघडे असावे. बुधाची अंगठी आकृतीत दाखविल्याप्रमाणे बाणाकृतीमध्ये पाचू बसवून करावी.पाचू खालून उघडा असावा.सोनारास हि अंगठी करण्यास जरा त्रास,कौशल्य लागेल.पाचू रत्न ठिसूळ असल्याने त्याला अंगठी सांभाळून/काळजीपूर्वक करण्यास सांगणे. गुरुमहाराजांची पुष्कराजची अंगठी आकृतीप्रमाणे समद्विभुज चौकोनी व त्या चौकोनात पुन्हा प्रत्येक कोपऱ्याला एक चौकोन असलेली अशी असावी.त्यामध्ये पुष्कराज बसवून खालून उघडा असावा. शुक्राची हिऱ्याची अंगठी आकृतीप्रमाणे षट्कोनी मंडळात हिरा बसवून करावी.येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी कि हिरा खालून उघडा ठेवू नये.हिऱ्याला कठोर रत्न म्हटलेले आहे.या कठोरतेमुळे बोटाच्या खाली भेगा किंवा चरा पडू शकतात म्हणून अंगठी खालून उघडी ठेवू नये.त्याचा बोटांना स्पर्श होता कामा नये. शनिमहाराजांच्या नीलमची अंगठी आकृतीत दाखविल्या प्रमाणे धनुष्याकृती आकारात बनवून त्यामध्ये सुंदर असे नीलम रत्न बसवावे.रत्न खालून उघडे असावे. राहूची अंगठी आकृतीत दाखवल्याप्रमाणे सुपासारख्या आकारात असावे.त्यामध्ये गोमेद रत्न बसवून खालून उघडे असावे. केतूची अंगठी आकृतीप्रमाणे ध्वजाच्या आकारात बनवून त्यामध्ये लहसुनिया रत्न बसवावे व ते खालून उघडे असावे. वराहमिहीरकृत बृहत्संहिता या ग्रंथांव्यतिरिक्त ऋग्वेदातील सहाव्या मंडळात एकोणिसाव्या सूक्तातील दहाव्या मंत्रात रत्न कसे धारण करावे याबद्दल माहिती दिलेली आहे.पुराण वाङ्मयातील अग्निपुराण. देवीभागवतात रत्नांबद्दल सविस्तर माहिती मिळते. चाणक्यच्या अर्थशास्त्रात रत्नपरीक्षा व रत्नांचा प्रभाव याबद्दलची माहिती मिळते. रत्नेन शुभेन शुभं भवति I अर्थात शुभ रत्न धारण केले असता सुख,समृद्धी प्राप्त होते असे वराहमिहीरकृत बृहत्संहिता या ग्रंथात म्हटले आहे कुंडलीचे मार्गदर्शन न घेता कुठलेही रत्न धारण करू नये.कुंडलीचा नीट अभ्यास करूनच रत्न घालणे फायदेशीर ठरते. "श्री कृष्णार्पणमस्तु " सर्व प्रकारचे नैसर्गिक रत्ने तसेच ज्योतिष/वास्तु मार्गदर्शनासाठी संपर्क: ASTRO SHUKRA (ज्यो.दिलीप जुगादे), ज्योतिष,वास्तु व रत्ने विशेषज्ञ Mno.& Whatsapp: 9822292432 #ग्रह नक्षत्र👉राशी भविष्य👉भक्ती👉अध्यात्मिक उपाय👉माहिती👉वास्तु सुख।
ग्रह नक्षत्र👉राशी भविष्य👉भक्ती👉अध्यात्मिक उपाय👉माहिती👉वास्तु सुख। - अंगाठ्ंचे प्रकार आकृती नं१ चंदाच अंगवी बवीची अंगठी [3] వైగ్రరే 30  शुक्रावी   अंगठी [] मूँगळाची अगठी चंढाची ओंगठी ल ] 'L) केतूची  आंगठी राहूची   ७ंठाठी ] बुधची   अंगाठी ర్ాలాగి 3101ర Eg] 4 8 0 अंगाठ्ंचे प्रकार आकृती नं१ चंदाच अंगवी बवीची अंगठी [3] వైగ్రరే 30  शुक्रावी   अंगठी [] मूँगळाची अगठी चंढाची ओंगठी ल ] 'L) केतूची  आंगठी राहूची   ७ंठाठी ] बुधची   अंगाठी ర్ాలాగి 3101ర Eg] 4 8 0 - ShareChat

More like this