ShareChat
click to see wallet page
❣️ या सुंदर सायंकाळी तुझ्यासोबत फोन कॉल वर घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खरंच अनमोल असल्याच जाणवलं मला, आकाशातल्या सूर्यास्ताच्या रंगांत जसं सौंदर्य सामावलं आहे, तसंच तुझं फोन करून बोलल्यावर माझं आयुष्य उजळून निघतं.... तुझं हसणं म्हणजे मंद झुळुकीसारखं, जे मनाला शांत करतं, आणि तुझ्या डोळ्यांत डोकावलं की जणू मला माझं जग दिसतं, तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण हा साधा नसून, तो माझ्या आठवणींच्या पेटीत साठवलेला एक सुंदर खजिना आहे.... तुझी साथ मिळणं म्हणजे आयुष्याच्या प्रवासाला मिळालेली खरी अर्थपूर्णता, या सायंकाळी घेतलेला प्रत्येक श्वासही तुझ्या नावाने सजलेला आहे... प्रेम हे फक्त शब्दांमध्ये नाही, तर या क्षणांमध्ये, व्यक्त केलेल्या भावनेत आणि या आपल्या फोन वर झालेल्या संवादत दडलेल आहे. आणि म्हणूनच, या अनमोल सायंकाळी तुझं मला कॉल करून बोलण, हेच माझं सर्वात मोठं सौख्य आहे.... *राधे... राधे...* 🌹〽️🌹 #☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹

More like this