ShareChat
click to see wallet page
"अनुराग........ आपण इकडे कुठे आलोय.....???" "अनु........ प्लिज बोल ना रे काहीतरी.......... अनुssssss........ काय झालं तुला...... तु असा गप्प का आहेस?????" "अनुssssss.......... मी तुझ्याशी बोलतेय???" तिने आता त्याचा हात पकडला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालुन विचारलं...... त्याने नजर चोरत दुसरीकडे पाहिलं....... आत्ता ते दोघे एका नदीच्या पुलावर होते, पावसाळी दिवस असल्यामुळे पुला खालून वाहणारी नदी दुथडी भरून वाहत होती.... वेगाचे वारे वाहत होते.... ज्या मुळे तिचे केस वाऱ्यावर भुरभूर उडत होते...... ती आपले केस सावरत त्याला प्रश्न करत होती, पण तो मात्र तिच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर न देता पुढे झपझप पाऊल टाकत होता.... "अनुराग जाहागीरदार......... काय चालूय तुझ्या मनात मला कळेल का????? आपण पोलीस स्टेशनं मध्ये जाणार होतो....... मग तु मला इकडे का घेऊन आला आहेस सांगशील का????" ती आत्ता त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकत त्याच्या समोर उभी राहून त्याला विचारत होती..... त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तसाच ताड ताड पाऊल टाकत पुढे चालू लागला... ती त्याच्या मागुन तितक्याच स्पीड मध्ये चालत होती.... त्याला प्रश्न करत होती..... तिच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता............ शेवटी पुन्हा एकदा तिने त्याला गाठलं आणि आता त्याचा हात पकडला..... "अनु............ प्लिज..... तु तरी मला समजुन घे..... तु तु तरी मला साथ दे..,........." तिच्या डोळ्यात वेदना होती... तडप होती...... त्याने मात्र एकवेळ तिच्याकडे पाहिलं आणि नंतर आपली नजर त्या उसळणाऱ्या नदीच्या पात्रा कडे वळवली........ "अनुराग..... मी तुला लास्टच विचारतेय....... तु जरी माझ्या सोबत नसलास तरी मला काहीच फरक नाही पडत........ मी मी तिला न्याय मिळऊन देईन.......... पण एक लक्षात ठेव मी त्या दोघांना त्यांच्या कर्माची शिक्षा दिल्या शिवाय शांत बसणार नाही...." ती त्याच्या नजरेत पाहुन ठाम पणे बोलत होती..... त्याचं वेळी त्याने तिचा हात पकडला आणि तिला नदीच्या पुलाच्या कठड्या जवळ घेऊन आला..... ती मात्र त्याच्या नजरेत बघत होती..... खुप वेळ पाहुन पण आत्ता त्याच्या नजरेतले भाव तिला कळत नव्हते..... "अनु.......... तु तु बोल ना काहीतरी.......... तु तु मला साथ देशील ना या न्यायाच्या लढाईत..... प्लिज बोल ना रे काहीतरी...." तिची पाठ त्या कठड्याला टेकली होती. ती त्याचा हात हातात घेऊन पुन्हा पुन्हा आपल्या निर्णयात त्याची साथ मागत होती........... "प्रीती....आय...... आय......... आय एम सॉरी....... प्लिज म मम्म मला माफ कर..................." आत्ता कुठे त्याच्या दाटलेल्या कंटातून वाक्य बाहेर पडलं.... ती मात्र त्याच्या नजरेत विश्वास शोधत होती...... पण त्याचं वेळी अचानक तिचे पाय खालून उचलले गेले आणि पुढच्या क्षणाला एखाद्या निर्जीव बाहुली सारखी ती कठड्या वरून खाली फेकली गेली........ तिच्या हातात असलेला त्याचा हात सुटत गेला................. आणि त्याचं वेळी............ "अनुरागsssssssss........!!!!!!" तिची ती भेदक किंकाळी...... त्याचं काळीज चिरत गेली........ तसा तो पायातले त्राण निघुन जाऊन आहे त्या जागेवर मटकन बसला........... "प्रीती................." त्याच्या मुखातुन आह्हहा बाहेर पडला.... आणि त्याचं वेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली...... डोळ्यातुन अश्रूचा पूर वाहत होता...... चार...... चार वर्षांच प्रेम!!!!.......... चार वर्षांच्या नात्याला त्याने स्वतःच्या हाताने तिलांजली दिली होती....... क्षणात स्वतःच्या प्रेमाला त्याने संपवलं होत......... चार महिन्या पूर्वीच देवा ब्राम्हणाच्या साक्षीने दोघांची बांधलेली रेशीमगाठ त्याने तोडून टाकली होती....... जिच्यावर जीव ओवाळून टाकत होता आज.... आज निर्घृण पणे त्याने तिचाच जीव घेतला होता........ तिचा त्याच्यावर असलेल्या अतूट विश्वासाचा क्षणात त्याने घात केला होता...... आत्ता स्वतःच्याच हातांकडे बघत तो ओक्साबोक्शी धाय मोकलून रडत होता.................... सर्वच संपलं होत............... त्याने स्वतः नेच आपलं सुंदर आयुष्य बरबाद केलं होत............ काळजातल्या अतीव प्रेमाचा अंत केला होता.......... मालवली होती प्रेमाची ज्योत..... दोघांनी सोबत पाहिलेलेल्या स्वप्नांची राख रांगोळी केली होती........ त्याने स्वतःच्या हातानेच सर्व संपवलं होत........... आणि आत्ता तो सुद्धा पूर्ण पणे तुटून गेलेला....... अजुनही वरून धो धो पाऊस कोसळत होता.............. आणि त्या पाऊसात त्याच्या डोळ्यातुन वाहणारे अश्रु विरून जात होते.......... तेवढ्यात तिथे एक इनोव्हा येऊन थांबली........... त्यातून दोघे जण बाहेर आले आणि त्याला तसच उचलून गाडीत टाकून घेऊन निघुन गेले.................... कथा लिहून पूर्ण आहे खाली दिलेल्या लिंक वरून प्रतिलिपी अँपवर ही राजकारणावर आधारित प्रेम कथा एकदा नक्की वाचा... स्टोरी लिंक 👇 pratilipimarathii.pratilipi.com/series/dn1gnaav7b3s?language=MARATHI&utm_source=android&utm_medium=content_series_share #✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #☺️प्रेरक विचार #🌹प्रेमरंग #📚मराठी रोमांचक कथा🧐
✍🏽 माझ्या लेखणीतून - ShareChat
00:10

More like this