*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*🌻चिंता🌻*
देवाच्या नामस्मरणाचे माणसाने नेहेमी चिंतन करावे, पण माणूस नेहमी चिंता करतो ती त्याने स्वतःच स्वतःसाठी लावून घेतलेली असते.
"चिंता" यामध्ये माणूस जास्त करून भरकटलेला व भरडलेला म्हणजे पिसलेला असते.
जेव्हा माणसावर संकटे येतात तेव्हाच त्याला बुध्दिकौशल्य व चातुर्य दाखविण्याची संधी प्राप्त झालेली असते. कितीही संकटे येऊ द्या. कधीही गांगारून किंवा घाबरून जाऊ नका. जीवनात जो उद्देश निश्चित केला असेल त्यासाठी जीवन समर्पित करा. आपल्या जीवनाला चालना कशी मिळेल ते बघा. जीवनात चिंता, संकटे हे आहे तसेच पर्याय मार्ग व आनंद हे ही सर्व असलेच पाहिजे. माणसाला चिंता आहेत म्हणूनच त्याने ईश्वर चिंतन केले पाहिजे. ईश्वरचिंतनाने माणसाचे मनोबल वाढते व आलेल्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडतोच.
काहीच्या पुढे कधीकधी ध्येय अथवा संकल्प नसल्यामुळे स्वैर वागतात. हातात भरपूर पैसा आला की मन मानेल तसे. चैन करणे, मद्यपान यासारख्या व्यसनांच्या आहारी जातात. घरातल्या परंपरेनुसार वागणे विसरून जातात. यामध्ये पाऊल घसरायची शक्यता अधिक राहाते..
काळजीही मागे असली पाहिजे. जर मागे काळजी नसेल तर जीवन जगणे अवघड होईल. मनुष्य पार वेडा होऊन जाईल. मनुष्याला एखादे वेळी ४/६ दिवस एकटे राहण्याचा प्रसंग आला तर तो बेचैन होतो. त्याला काही सुचत नाही. पण त्याच्या मागे काही काळजी चिंता असली तर त्याचा विचार करण्यामध्ये त्यातून मार्ग काढण्यामागे व त्याची पूर्तता करण्यात त्याचा वेळ जाईल. हे जरी असले तरी चिंतेचे प्रमाण जास्त ठेवू नका. नाहीतर समतोल बिघडून माणूस बेचेन वेड्यासारखा वागायला लागू शकतो.
फार सुखी असेल तर माणसाला ईश्वराची आठवण होतेच असे नाही, परंतु संकटात, चिंतेत, काळजीत तरी नक्कीच देवाची आठवण होते म्हणूनच हा आपल्यावर देवाने केलेला मोठा उपकारच आहे समजावे. चिंता, दुःख, कष्ट योगायोग ने मनुष्याल रोजच्या जीवनात थोड्याफार प्रमाणात कमी अधिक जास्त आपल्या वाट्याला येतातच. चिंतेशिवाय मनुष्य जीवन नाही. चिंता असली तरी त्यातून मार्ग व पर्याय काढण्यासाठी मन स्थिर असणे गरजेचे आहे त्यासाठी चिंता सोडून ईश्वर नाम स्मरणाचे शुद्ध अंतकरणाने चिंतन केले पाहिजे, चिंता करीत बसू नये. चिंता केल्याने ती सुटत नाही. चिंतारहित होण्याचे परमार्थ हे एक उत्तम साधन आहे..!!✍🏻
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻*
#महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #महानुभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #सु-प्रभात🌅शुभ सकाळ🌄Good morning
