https://batminews.com/narendra-modi-3/ #news

Narendra Modi
पंतप्रधान (Narendra Modi) नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाच्या २५ वर्षांची सुरूवात : गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला आज २४ वर्षे पूर्णगुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ ऑक्टोबर) आपल्या नेतृत्वाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा साजरा केला. २००१ च्या याच दिवशी त्यांनी प्रथमच गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्या घटनेनंतर आज म्हणजेच २०२५ मध्ये नरेंद्र मोदींनी सरकारप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारण्याचे २५वे वर्ष गाठले आहे. पंतप्रधान मोदींनी या निमित्ताने आपल्या ‘एक्स’ (माजी ट्विटर) खात्यावरून नागरिकांना संदेश दिला. त्यांनी लिहिले की, “२००१ मध्ये आजच्या दिवशी मी प्रथमच गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. माझ्या सहकारी भारतीयांच्या सततच्या आशीर्वादामुळे मी शासनाच्या प्रमुखपदी २५व्या