#🙏शिवदिनविशेष📜 *🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* 📜 ५ ऑक्टोबर इ.स.१५२४ महाराणी दुर्गावती यांची जयंती. दुर्गावती राणीचा जन्म दुर्गाष्टमीला ५ ऑक्टोबर १५२४ रोजी बांदा (कालांजर) यूपी येथे झाला. ती चंदेल वंशाची होती. १५४२ साली तिचे लग्न दलपत शाहशी झाला. दलपत शाह गोंड (गढ़मंडला) राजा संग्राम शाह यांचे ज्येष्ठ पुत्र होते. लग्ना नंतर फक्त चार वर्षातच दलपत शाह मरण पावला आणि राज्यकारभार दुर्गावती राणीकडे आला. ती गोंड (गोंडवाना) राज्याची पहिली राणी झाली, अकबराच्या दबावाला बळी न पडता तीने लढा दिला आणि त्यात तीने स्वतचा जीव दिला. मोगल सम्राट अकबर संपूर्ण हिंदुस्थानात आपली सत्ता वाढवू पाहत होता. त्यावेळच्या सर्व राजा-महाराजांना त्याने, एकतर मोगल साम्राज्याचे सेवक व्हा किंवा युद्धाला तयार रहा असा प्रस्ताव पाठवला होता, ज्यामध्ये बरेच राजपूत मोगलांचा हा प्रस्ताव स्वीकारून मोगलांचे मांडलिकत्व पत्करले होते. या प्रस्तावाला धुडकावून लावणारी मंडळी सुद्धा होती ज्यामध्ये आपणास महाराणा प्रताप ये नाव माहीतच आहे. परंतु या मध्ये एक महाराणी होती जिने त्याचा हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि मोगलांशी लढली. या राणीचे नाव आहे "महाराणी दुर्गावती" !! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ५ ऑक्टोबर इ.स.१६७० "द्वितीय सुरत लूट" - तृतीय दिन#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती

00:15