#🙏शिवदिनविशेष📜 ⛳आजचे ऐतिहासिक शिवकालीन दिनविशेष⛳ 📜 ३ डिसेंबर इ.स. १६७९ सिद्धीस मूर्खात काढून मराठ्यांची दोन जहाज खांदेरीस पोहचले..!! १ डिसेंबर रोजी खांदेरीला मराठ्यांचा एक लहान मचवा काही रसद घेऊन गेला व सिद्दी आणि इंग्रज यांना तो अडवता आला नाही. पुढे ३ डिसेंबर रोजी एक चमत्कारिक घटना घडली. मराठ्यांची २ जहाजे बेटाकडे जाताना सिद्दयाला दिसली व त्याने ती अडवली असता ती थांबली. सिद्दयाच्या लोकांनी त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी आपण इंग्रज नौका दलातील असून त्यांनी आपल्या नाविक दलाच्या कॅप्टन आणि नौकेचा खलाशी यांचीही नावे त्वरित सांगितली आणि त्यांनी त्वरित जाऊ द्यावे, अशी मागणी केली. कारण आपण काही मराठी नौका दक्षिणेच्या बाजूने येताना पाहिल्या असून त्याची माहिती मिळवण्याकरिता जात असल्याचे सांगितले. सिद्दयाच्या त्या लोकांना खात्री पटली व त्यांनी मराठ्यांना जाऊ दिले व पुढे त्यांना दिसले की, ते खांदेरीच्या आखातात जाऊन तिथेच नांगरले. त्यावरून त्यांना समजले की, ते मराठेच होते व आपल्याला मूर्खात काढून ते पळून गेले. ही माहिती सिद्दयाच्या त्या जहाजावरील एका हशमाने इंग्रजांच्या सेवेतील एका मुसलमानाला दिली व त्यावरून ती इंग्रजांनी नमूद केली. ३ डिसेंबर रोजी सिद्दीच्या आरमाराचा मुख्य सिद्दी कासीम आणि केग्वीन यांची भेट झाली व कासीमने आता आपण बेटावर उतरून काय तो सोक्षमोक्ष लावूया, असे सांगितले असता केग्वीनने आपल्याला मुंबईहून आदेश येईल तसेच आपण वागू, असे सांगितले. यावेळी केग्वीनने सिद्दीच्या जहाजावर काही मराठी गुलाम मंडळी पाहिली व ही कुठून आली विचारले असता सिद्दीने सांगितले की, आपण मराठ्यांच्या मुलुखात शिरून जाळपोळ केली व काही गुलाम पकडून आणले. तसे केग्वीनने हे लिहून मुंबईला पाठवले.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
00:29
