टीप टिप येता सरी
गुण गुण गाणं गाई परी,
डोळा भिजताना शहारे दाटे अंगावरी
तुझ्या माझ्या प्रितीची हीच चाहुल खरी.
रंग रंगले हे, फुले थिजली
तु येता एकदा मन माझे भिजले,
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे हाच हट्टहास
रानोरान गुंजेल तुझा माझा एक श्वास.
राघु ऐकलाच शोधत असे घरटे
राघु विना मैनेचे प्रेम झाले चोरटे ,
नको करू तोलमाप तुझे माझे प्रेम किती
मोजता वाटे तुझं विन जगण्याची भिती
तु येता वेग धरतात स्थिरावलेले झोके
सुरु होतो दिस निघुन जातात धुके,
थेंब थेंब पडता मोती होतो धरतीवरी
दरवळतो गंध हसते तु एक परी
तुझ्या माझ्या प्रितीची हीच चाहुल खरी. #🖋शेरो-शायरी #📝कविता / शायरी/ चारोळी #💞इश्क-मोहब्बत शायरी🤩 #🌹मराठी शायरी #🥰प्रेम कविता📝