सणासुदीत सोन्या-चांदीच्या भावात महागाईचा गरबा, बाजार उघडताच गाठला नवा उच्चांक; चांदीने धरलाय सुस्साट वेग
Gold Silver Price Update 30 Sept 2025: सोन्या आणि चांदीची दरवाढ थांबायचं नाव घेत नाही आहे. सोन्याचा भाव दिवसेंदिवस नवनवीन रेकॉर्ड करत आहे तर दुसरीकडे, चांदीची किंमत देखील आता दीड लाखांच्या जवळ उसळली आहे. आता सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारात सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. आजच्या दिवशी सराफा बाजारात खरेदीला जाण्याआधी 10 ग्रॅम सोन्याचा आणि प्रति किलो चांदीचा भाव माहिती करून घ्या.