#☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🎭Whatsapp status #✨सोमवार स्पेशल✨ #🙏नवरात्र स्टेट्स🌺 =
दि. २९/०९/२०२५,सोमवार
नवरात्र -आठवी माळ (अष्टमी)
आठवे रूप -महागौरी देवी
आजचा रंग-मोरपंखी
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते, त्यापैकी आठवे रूप 'महागौरी देवी'आहे.
श्वेते वृषेसमारुडा श्वेताम्बरधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।
शुद्धतेचं, शांततेचं आणि सौंदर्याचं प्रतीक… महागौरी देवी
नवरात्रीतील आठव्या दिवशी महागौरी देवीची उपासना केली जाते. गौरवर्णामुळे देवीला महागौरी असे नाव देण्यात आले.
गौरवर्ण, शुभ्र वस्त्र, आणि करुणामय रूप धारण करणारी महागौरी माता भक्तांवर कृपा करून त्यांना शांती, सौभाग्य आणि समृद्धी प्रदान करते.
-----------------------------------------
नवरात्राच्या आठव्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या णाऱ्या देवीचा गौरवर्ण आहे. श्वेत वस्त्रे व आभूषणे धारण करते, त्यामुळे या देवीला महागौरी म्हणतात. या देवीची आयुमर्यादा आठ वर्षे मानली जाते. या चतुर्भुज देवीच्या उजव्याा एका हाताची वरमुद्रा व दुसऱ्या हातात त्रिशुभ आहे देवीचे वाहन वृषभ (बैल) आहे. या देवीच्या उपासनेने सर्व प्रकारचे शीघ्र फळ मिळते, पूर्वजन्मीच्या संचित पापांचा विनाश होऊन मनोरथ सिध्द होतात.
-----------------------------------------
महागौरी माता हे देवी दुर्गेचे आठवे रूप असून ती पवित्रता, तेज आणि शांततेचे प्रतीक आहे. तिला चार हात आहेत, ज्यात त्रिशूळ, डमरू आणि अभय मुद्रा असते. महागौरी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते असे मानले जाते. महागौरीच्या कृपेनें सर्वत्र शांतता, सौख्य आणि आनंद नांदो, ही प्रार्थना.
✨ जय माता दी ✨
🌸🙏 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸
