💔🙇🏼♂️💔
भावनिक माणसे कुठल्याच गोष्टीला घाबरत नाहीत, त्यांची हिंमत सोडत नाहीत, ती अडून राहातात स्वतःच्या तत्वांवर, ती कुणालाच दुखवत नाहीत, त्यांना हरवणं कठीण जातं , ती सहजासहजी निराश होतं नाहीत, ती खचत नाहीत लहानसहान गोष्टींंमुळे...
तुम्ही त्यांचा अनादर करा तरिही ती तुमचा मान ठेवतील,
तुम्ही राग राग करा ती आतून शांत शांत होत जातील...
तुम्ही त्यांच्यावर हसाल..
ती कोपरा धरून बसतील तिथेच भरून आलेले डोळे रिते करतील पण त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याची जखमही तुम्हाला दाखवणारं नाहीत...
ती एकटी एकटी पडत जातील
आतून पोकळ होतील
निराश होतील
पण
सतत वरवर खळखळते ठेवतील हसण्याचे झरे ...
ती हरणार नाहीत
जिंकता येणार नाहीत
म्हणून
मग
त्यांचं भावनिक असणंचं उगारलं जाईल त्यांच्या विरोधात शस्रासारखं,
ती फक्त प्रेमानेच जिंकता येतील,
हे जाणून सुड उगारला जाईल त्यांच्यावर "त्यांनाच प्रेमात पाडून''
भावनिक माणसे
प्रेमासमोर मान टाकतील
जीव देतील
आणि
नंतर त्याच प्रेमाकडून झिडकारली जाऊन
संपवली जातील...
प्रेम माणसाला कोडगं करण्यासाठी वापरलं जाईल
आणि
भावनिक माणसं प्रेमाला घाबरायला लागतील...
एके दिवशी जगात फक्त व्यवहारी लोकचं उरतील
*एवढचं होईल!*
💔😞💔 #✍🏽 माझ्या लेखणीतून