https://batminews.com/package/ #news

Package
महाराष्ट्रातील अतिवृष्टीने प्रभावित शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ३१,६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची(Package) घोषणा केली आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक मदत पॅकेज मानला जात आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील ६९ लाखहून अधिक हेक्टरे शेतजमीन खराब झाली असून, २९ जिल्हे, २५३ तालुके आणि २०५९ ग्रामपंचायतींना या मदतीचा लाभ मिळणार आहे. तीन हेक्टरपर्यंतच्या जमिनीवर लागवड करणाºया शेतकऱ्यांना विविध स्वरूपातील मदतीचा समावेश करण्यात आला आहे.