बस अपघात: 45 भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली #😭बस अपघात: 45 भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली💐

बस अपघात: 45 भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली
सौदी अरेबियात उमरा यात्रेला गेलेल्या भारतीय यात्रेकरूंच्या झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. मदीनाजवळ झालेल्या या अपघातात ४५ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतेक जण तेलंगणातील हैदराबादचे रहिवासी होते. अपघाताची तीव्रता यावरून अंदाजे काढता येते की बसला आग लागली आणि त्यात अनेक प्रवासी जागीच जळून खाक झाले. - 45 Indian nationals killed in accident near Madinah
