माणूस सुद्धा दिवाळीच्या फराळासारखा असतो.
काही माणसं चिवडया सारखं सगळीकडे बेमालूमपणे मिसळणारी
.
काही चकली सारखं स्वतःमध्येच गुरफटलेली असतात.आत्ममग्न असतात.
काही लाडू सारखी खुशाल चेंडू असतात.जिथे जातील तिथे गोडवा निर्माण करतात.
काही शेव सारखी स्वतःची गुंतागुंत करून कुठून बोलायला सुरुवात करावी हे न कळणारी असतात.
काही करंजी सारखी बाहेरून चव नसलेली पण एकदा का त्यांच्या अंतरंगात पोहचली की सारणासारखी गोड गोड असतात.
अशी सर्व माणसं एकत्र आली की जे तयार होते, त्याला मनुष्य स्वभावाचा फराळ म्हणतात.
तो ज्याला खायला जमतो त्यांने आयुष्याची दिवाळी साजरी केली असं म्हणतात...
*दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन* 💐 #✨शुभ दीपावली🪔
